वैशाली म्हेत्रेंची जामखेड नगरपरिषदेच्या स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापती पदी निवड..
स्वच्छ जामखेड,सशक्त जामखेडकर ही संकल्पना राबविण्यासाठी प्रयत्न करणार :वैशाली म्हेत्रे,सभापती आरोग्य व स्वच्छता समिती..

जामखेड प्रतिनिधी
जामखेड नगरपरिषदेच्या स्थायी समितीच्या नुकत्याच निवडी जाहीर झाल्या या निवडीमध्ये नगरसेविका वैशाली अर्जुन म्हेत्रे यांना अरोग्य व स्वच्छता समितीच्या सभापती पदाची मोठी जबाबदारी पक्ष नेतृत्व व सहकारी नगरसेवक व नगराध्यक्षांनी दिली आहे.

या निवडीनंतर बोलताना सौ.म्हेत्रे म्हणाल्या की जामखेड शहरात सद्यस्थिती स्वच्छतेची आडचण आहे ठिक ठिकाणी कचरा साठला आहे उघड्या गटारी तसेच सांडपाणी रस्त्यावर येताना दिसत आहे त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आसुन नागरिकांना आरोग्याची समस्या जाणवत आहे त्यामुळे पुढील काही दिवसांत स्वच्छ जामखेड सशक्त जामखेडकर ही संकल्पना राबविण्यासाठी सर्वांच्या सहकार्यने मी प्रयत्न करणार आहे.

तसेच आम्ही तुमचे जनसेवक म्हणून काम करणार आहोत त्यामुळे सभापती प्रा.राम शिंदे व नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी व सर्व सहकारी नगरसेवकांनी व जामखेडच्या नागरिकांनी टाकलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही तसेच गेली आनेक वर्षापासून जी विकासकामे रखडलेली आहेत ती पूर्ण करण्याचा विश्वास व्यक्त करते आसे सांगितले



