शाळेत मिळालेले संस्कार हेच विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील यशाची गुरुकिल्ली ठरते:नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी.

- Advertisement -spot_img

शाळेत मिळालेले संस्कार हेच विद्यार्थ्यांच्या आयुष्याची गुरुकिल्ली ठरते:नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी.

जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेले विद्यार्थी आज उच्चपदस्थ आहेत : ॲड.प्रविण सानप,शिक्षण सभापती नगरपरिषद जामखेड

जामखेड प्रतिनिधी

अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळतो. शाळेत मिळालेले धडे, शिस्त आणि संस्कार हेच विद्यार्थ्यांच्या आयुष्यात पुढे यशाची गुरुकिल्ली ठरतात,असे यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा स्थानावरून जामखेड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी बोलताना म्हणाल्या.

शहरातील ऐतिहासिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मराठी मुले येथे मंगळवार दिनांक २४ मार्च २०२६ रोजी वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडले. यावेळी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करून तसेच दिप प्रज्वलनाने झाली. या कार्यक्रमासाठी उपनगराध्यक्ष पोपट राळेभात,जामखेड नगर परिषदेचे शिक्षण समितीचे सभापती ॲड.प्रविण सानप, बांधकाम समितीचे सभापती मोहन पवार,नगरसेविका नंदाताई होळकर,संगिता भालेराव,भाजपा युवा नेते पाणी पुरवठा माजी सभापती अमित चिंतामणी,शिवसेनेचे युवा नेते आकाश बाफना,सामाजिक कार्यकर्ते नासीर सय्यद,धनराज पवार तसेच केंद्रप्रमुख राम निकम, केशव गायकवाड,माजीद शेख,पांडुरंग मोहळकर,मुख्याध्यापक जालिंदर अहिरे(मराठी मुले),मुख्याध्यापक दत्तात्रय यादव(मराठी मुली) ,मच्छिंद्र खैरे,शाळा व्यवस्थापन समिती मराठी मुले नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन टेकाळे,अध्यक्ष प्रा.डाॅ.शिवाजी राळेभात,निलेश गायकवाड आदी मान्यवर, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलताना चिंतामणी म्हणाल्या,या स्नेहसंमेलनातून सादरीकरण करणारे विद्यार्थी भविष्यात शिक्षक,डॉक्टर, कलाकार, संगीतकार तसेच अभियंते बनतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी नगर परिषद शिक्षण विभागाचे सभापती ॲड.प्रविण सानप यांनी आपल्या भावना व्यक्त करत सांगितले की,आम्ही याच जिल्हा परिषद शाळेत घडलेलो आहोत ,आणि आज उच्च पदावर काम करीत असून या शिक्षण सभापती म्हणून माझी निवड झाली ते आज माझे भाग्य समजतो, आणि जुन्या काळातील शिक्षणाच्या आठवणींना उजाळा दिला.जिल्हा परिषद शाळेबद्दल अभिमान व्यक्त करत, या शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी व सर्वांगीण विकासासाठी जामखेड नगर परिषदेकडून जे काही सहकार्य लागेल त्यासाठी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती नामदार प्रा राम शिंदे साहेब व लोकनियुक्त नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य आणि मी शिक्षण कमिटीचा सभापती म्हणून काम केले जाईल असे सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यापिका वंदना मोरे,जया चौभारे,राधा डिसले,अलका धाउड,संध्या खंडागळे,कालींदा मेहत्रे,साधना आरडक,सरिता कवडे,कल्पना साबळे, श्रीमती सारिका पोले,शुभांगी साळुंखे,लक्ष्मी जायभाय तसेच नितीन मोहोळकर यांच्यासह जि.प.प्राथ,शाळा मराठी मुली येथील शिक्षक अंबादास जोगदंड, संतोष ससाणे तसेच शिक्षिका निशा कदम,अर्चना भोसले,निर्मला सिद्धेश्वर,सोनाली झोरे,प्रतिभा ढोबळे पाटील,भारती क्षिरसागर,मनीषा पवार आदींनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक जालिंदर अहिरे व सुत्रसंचलन ज्ञानेश्वर कोळेकर यांनी केले तर आभारप्रदर्शन सागर माकुडे यांनी मानले.विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कलांचे सादरीकरण करत उपस्थित मान्यवर व पालकांची मने जिंकली

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा