शिर्डी येथे धनगर आरक्षणासाठी राज्यस्तरीय बैठक
हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे : पांडुरंग माने
जामखेड प्रतिनिधी
धनगर जमातीच एसटी आरक्षण अनुसूचित जमातीच्या आरक्षणाबाबत पुढील दिशा ठरवण्यासाठी ११ फेब्रुवारी रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे भव्य राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला राज्यभरातील धनगर समाजबांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पांडुरंगा माने यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या पृष्ठ क्रमांक ३६ वर

अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट केलेले असतानाही, तत्कालीन राज्यकर्त्यांनी धनगर समाजाला एसटी आरक्षणापासून वंचित ठेवण्याचे पाप केले असल्याचा आरोप मा. पांडुरंग माने सदस्य:- महाराजा यशवंतराव होळकर समिती महाराष्ट्र राज्य यांनी केला आहे.

आता ही लढाई निर्णायक टप्प्यावर असून संघर्षयोद्धा दिपक भाऊ बोराडे यांच्या नेतृत्वाखाली समाजाला स्वाभिमानी आणि ठाम दिशा मिळाली आहे. त्यामुळे धनगर समाजाने एकसंघ होऊन पुढील वाटचाल ठरवण्याची गरज आहे, असे आवाहन त्यांनी केले. शिर्डीतील एल्गार सभेला उपस्थित राहून आपली ताकद दाखवावी, असे आवाहनही त्यांनी समाजबांधवांना केले.

11 फेब्रुवारीला राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन सद्गुरु साईबाबांच्या आशीर्वादाने व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचे जन्मगाव असलेला जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी पहिल्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व समाज बांधवांना अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने आमंत्रित करू इच्छितो की आपण हजर राहावे हि नम्र विनंती
मा पांडुरंग माने. मो. 7774096005
सदस्य:-महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक सोहळा समिती महाराष्ट्र राज्य


