सावरगाव शिवारात ट्रकला दुचाकी आडवी लावून,काच फोडून चाकूचा धाक दाखवून लुटमार.
आरोपीस १२ तासात केले जेलबंद जामखेड पोलीसांची कामगिरी.
जामखेड प्रतिनिधी
दि.३१/०३/२०२६ रोजी फिर्यादी नामे संतोष बिभीषन फरताडे धंदा ड्रायव्हर रा. सोमनाथ वाडी ता.जि. बीड यांनी फिर्याद दिली की, दि. ३०/०३/२०२६ रोजी मी व बाळू शामराव तांबे रा. परांडा जि.धाराशिव असे ट्रक क्र. MH१४LX९९६९ ही मध्ये कोबंडीचे खादय घेवून पुणे येथून माजलगावकडे जात असताना दि.३१/०३/२०२६ रोजी रात्री ००.३० वा.चे सुमारास जामखेड ते साकत रोडने जामखेड पासून ५ की मी अंतरावर स्पीड ब्रेकर आल्याने आम्ही गालीचा स्पीड कमी केला तेंव्हा एक स्कुटीवरील स्वार हा त्याची स्कुटी घेवून आला व आमचे ट्रकसमोर समोर आडवी लावून आमची ट्रक थांबवली.

आमची ट्रक थांबल्यानंतर मोटारसायकलवर इतर तीन लोक आले व त्यांनी ट्रकची काच फोडून आम्हाला मारहान करून चाकुचा धाक दाखवून बळजबरीने खिशातील रोख रक्कम व गाडीतील साहीत्य काढून घेतले. वैगेरे म // चे फिर्यादीवरून जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा रजि. नं.१७५/२०२६ बी एन एस कलम ३०९ (६),३२४(४), ३ (५), प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यांनतर सदर आरोपीचा शोध घेत असताना गुन्हा घडले ठिकाणी एक मोटारसायकल ही लपवून ठेवलेल्या अवस्थेत मिळून आल्याने सदरच्या मोटारसायकल वरून सदरचा गुन्हा हा इसम नामे १) शुभम सुर्यभान चव्हाण २) शुभम ज्ञानोबा चव्हाण, ३) राम अशोक अडाले व एक अल्पवयीन विधीसंर्घषीत बालक सर्व रा. सावरगाव ता. जामखेड जि. अहिल्यानगर यांनी केला आहे.

अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने मा. पोनि श्री दशरथ चौधरी साो. यांनी सदरची माहीती गुन्हे शोध पथकाचे पोना/२०८७ रविंद्र वाघ, पोकॉ/२४२७देविदास पळसे, पोकॉ/ ७५४ कुलदिप घोळवे, पोकॉ/१०१३ आकाश शेवाळे अशांना देवून सदरचे पथकाने तांत्रिक माहीतीच्या आधाराने आरोपी नामे शुभम सुर्यभान चव्हाण व राम अशोक अडाले यांना सोनेगाव ता. जामखेड परिसरातनू ताब्यात घेतले तसेच आरोपी नामे शुभम ज्ञानोबा चव्हाण यास सावरगाव डोंगर परिसरातून ताब्यात घेतले आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री सोमनाथ घार्गे साो, अहिल्यानगर, मा. अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे साो, अहिल्यानगर, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्री प्रविणचंद्र लोखंडे साो, कर्जत विभाग कर्जत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. दशरथ चौधरी, पोसई किशोर गावडे, परि पोसई पुष्कर कडू, पोना/२०८७ रविंद्र वाघ, पोकॉ/२४२७ देविदास पळसे, पोकॉ/ ७५४ कुलदिप घोळवे, पोकॉ/१०१३ आकाश शेवाळे, पोकॉ/७५० ज्ञानेश्वर बेल्हेकर, पोकॉ/७४९ भागीरथ देशमाने, पोकॉ/३८९ दत्तु बेलेकर, पोकॉ/२६६३ इश्वर माने, होमगार्ड भारत चव्हाण, संदिप चव्हाण, गणेश गायकवाड, दिंगाबर औचारे तसेच दक्षिण विभाग मोबाईल सेलचे पोकों/ नितीन शिंदे, राहुल गुंडू यांनी केली आहे.



