स्थानिक गुन्हे शाखा व जामखेड पोलिसांची संयुक्त कारवाई…

- Advertisement -spot_img

जामखेडमध्ये एम.डी.सह २.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त; स्थानिक गुन्हे शाखा व जामखेड पोलिसांची संयुक्त कारवाई…

जामखेड प्रतिनिधी –

स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर व जामखेड पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त कारवाईत जामखेड शहरात विक्रीसाठी आणलेला मॅफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून एकूण २ लाख २३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे नोडल अधिकारी पोलीस निरीक्षक किरणकुमार कवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत माहिती संकलन सुरू केले होते.

गुप्त माहितीच्या आधारे मंगेश हिरामन पवार (वय ३०, रा. कान्होपात्रानगर, जामखेड) हा एम.डी. विक्रीसाठी जामखेड-कर्जत रोडवरील वैशाली वुड फर्निचर दुकानासमोर येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या झडतीत ६.१७ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) किंमत १,२३,४०० रुपये व १ लाख रुपये किंमतीची मोटारसायकल असा एकूण २,२३,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपीने हा अंमली पदार्थ मकसूद बागवान (रा. करमाळा, जि. सोलापूर – फरार) याच्याकडून आणल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत कलम ८(क), २१(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद लोखंडे (कर्जत विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा