२०२६ च्या”तरंग” महोत्सवात जामखेडच्या निवासी शाळेच्या विद्यार्थींचा सक्रिय सहभाग..
२०० मिटर या स्पर्धेत प्रदिप काळे या विद्यार्थ्यांने पटकावला द्वितीय क्रमांक..
जामखेड प्रतिनिधी
समाज कल्याण आयुक्तालय पुणे अंतर्गत प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण नाशिक विभाग यांच्या अंतर्गत साह्यक आयुक्त धुळे यांच्या वतीने नुकतेच २०२६ ‘तरंग’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

विभागातील शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यामध्ये जामखेड येथील आनु सुचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा आरोळेनगर या शाळेतील विद्यार्थ्यांनी खो.खो.१००,२००,४००मिटर थावणे तसेच रस्सीखेच इत्यादी खेळामध्ये आपला सक्रिय सहभाग घेतला होता.

२०० मिटर धावणे या स्पर्धेत या ओशाळेचा विद्यार्थी प्रदिप बापु काळे याने द्वितीय क्रमांक पटकावला तर बाकी विद्यार्थींनी सर्व स्पर्धात सहभाग घेऊन आपली चुनुक दाखवली विद्यार्थींच्या कला गुणांना वाव मिळावा तसेच त्यांना शिक्षणाबरोबरच आपल्यातील सृप्त गुण कला क्रिडा यांची आवड निर्माण व्हावी यासाठी राज्य पातळीवर आशा स्पध्रेचे आयोजन करण्यात येत आसते.

या स्पर्धासाठी त्यांना शाळेचे मुख्याध्यापक सुभाष शितोळे,आधिक्षक मधुकर महानुर,क्रिडा शिक्षक गोविंद शिरपे,यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले होते तर समाज कल्याण साह्यक आयुक्त संजय सौंदाणे,प्रादेशिक उपायुक्त नाशिकचे माधव वाघ,यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा पार पडल्या

तसेच जामखेड सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थीही आता कोणत्याही पातळीवर मागे रहाणार नाहीत आणी शिक्षण कला क्रिडा स्पर्धांमध्ये ते सहभागी होऊन भविष्यात चांगली कामगिरी करून आपल्या भागाचे व शाळेचे नाव उज्ज्वल करतील आसे आहिल्यानगर जिल्ह्याचे साह्यक आयुक्त प्रवीण कोरगंटीवार यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत आभिनंदन व्यक केले होते.


