जामखेड नगरपरिषद निवडणूकीसाठी प्रभाग दोन व चारसाठी आज मतदान

- Advertisement -spot_img

अकरावाजेपर्यंत झाले 20%टक्के मतदान,उद्या होणार फैसला!उमेदवारांची वाढली धाकधुक…

जामखेड प्रतिनिधी
जामखेड नगर परिषद निवडणुक 2025 साठी दोन डिसेंबरला मतदान झाले परंतु न्यायालयीन प्रक्रियेमुळे प्रभाग दोन मध्ये दोन ब
व प्रभाग चारमधील दोन ब साठी आज मतदान सुरू आसुन अकरावाजेपर्यंत सुमारे वीस टक्के मतदान झाले आहे

प्रभाग दोन साठी एकुण चार मतदान केंद्र आसुन एक केंद्र धोत्री याठिकाणी आसुन तीन केंद्र हे शहरातील जि. प. प्रा. मराठी मुले मुली या शाळा याठिकाणी आहेत तर प्रभाग चारसाठी ल. ना.होशिंग विद्यालयात तीन मतदान केंद्र आहेत


सकाळी मतदानासाठी मतदारांनी चांगला प्रतिसाद पहावयास मिळाला आहे मतदानाची वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच पर्यंत आहे त्यामुळे या दोन प्रभागासाठी चांगली टक्केवारी वाढेल आशी आशा उमेदवारांना आहे

उद्या होणार मतमोजणी
जामखेड नगरपरिषद निवडणूकीच्या बारा प्रभागासाठी चोवीस नगर सेवक व एक नगराध्यक्षांसाठीची मतमोजणी उद्या सकाळी नऊ वाजता सुरू होणार आहे जामखेड शहरातील नविन नगर परिषद कार्यालयाशेजारील प्रांगणात मतमोजणी पार पडणार आसल्याने जामखेडकरांचे या निकालाकडे लक्ष लागले आहे
कोण होणार जामखेडच्या नगराध्यक्षा उद्या फैसला..

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा