शंभर टक्के शास्ती माफ हि फसवी आफवा:मुख्याधिकारी अजय साळवे..
50 टक्के शास्ती माफी चा जामखेड नगरपरिषदेच्या हद्दीतील नागरिकांनी लाभ घ्यावा.
जामखेड प्रतिनिधी
जामखेड नगरपरिषदेच्या हद्दीतीत्ल नागरिकांनी ३१ मार्च पर्यंत आपली घरपट्टी व पाणीपट्टी वेळेत भरून शासनाच्या वतीने अभय योजनेचा लाभ घ्यावा शास्ती च्या ५० टक्के माफी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी केले आहे.

जामखेड शहरात शंभर टक्के शास्ती माफी च्या अफवा पसरल्या असून आशा आफवावर विश्वास ठेऊ नका कारण महाराष्ट्र शासनाच्या वतीने शास्ती च्या व्याजामध्ये जिल्हाधिकारी यांनी 50 टक्के शास्ती माफ केली असून हि योजना फक्त 31 मार्च पर्यंतच आहे

जामखेड नगरपरिषदेच्या हद्दीतील सर्व नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपली घरपट्टी व पाणीपट्टी वेळेत भरून अभय योजनेचा फायदा घ्यावा तसेच हि योजना फक्त 31 मार्च पर्यंतच असून 50 टक्के शास्ती माफीचा लाभ घ्यावा असे आवाहन जामखेड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजय साळवे यांनी केले आहे,

जामखेड शहरातील विविध विकास कामे नगरपरिषदेच्या करातून केली जातात तसेच संपूर्ण नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना या करा मधून पगार दिले जातात त्यामुळे जामखेड शहराच्या विकासासाठी आपली घरपट्टी व पाणीपट्टी वेळेत भरून नगरपरिषदेस सहकार्य करावे असे आवाहन केले आहे

३१ मार्च पर्यन्त नगरपरिषद कार्यालय सुट्टीच्या दिवशी म्हणजे रामनमवी,शनिवार,रविवारी,महावीर जयंती या दिवशी देखील नागरिकांच्या सोईसाठी व ५०% शास्तीमाफीचा लाभ मिळावा यासाठी कार्यालयीन वेळेत म्हणजेच सकाळी ९.३० ते दुपारी ५.३० पर्यंत सुरु राहील…



