धक्का लागल्याच्या कारणावरून लाकडी ठोकळ्याने मारहाण करून एकास केले गंभीर जखमी..

- Advertisement -spot_img

जामखेड पोलीस स्टेशनला तीन जणांना विरोधात गुन्हा दाखल..

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुक्यातील नान्नज येथील हॉटेलमध्ये पाणी घेण्यासाठी गेलेल्या तरुणास धक्का लागल्याच्या कारणावरून तीन जणांनी बेदम मारहाण केली. तसेच लाकडी ठोकळ्याने केलेल्या मारहाणीत फीर्यादी हा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाली आहे.

याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला तीन आरोपींन विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी योग्य कलम लावुन तातडीने आरोपींना अटक करण्याची मागणी जखमीच्या नातेवाईकांनी निवेदनद्वारे केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की नान्नज येथे दि 17 जुन 2025 रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास फीर्यादी विक्रम बबन कोळी हा एका हॉटेलमध्ये त्याचा भाऊ येणार असल्याने थांबला होता. यावेळी फीर्यादी हा हॉटेल मध्ये पाणी घेण्यासाठी गेला होता. यावेळी तीथे बसलेला आरोपी सोमनाथ भरत मोहळकर याच्या पायाची लाथ फीर्यादी विक्रम कोळी यास लागली. त्यावेळी फीर्यादी कोळी याने त्यास विचारणा केली असता तो फीर्यादीस शिवीगाळ करुन म्हणाला की तु लई माजला का तुला दाखवतो. त्यानंतर फीर्यादी कोळी हा हॉटिल समोर आला असता तेथे दुसरे आरोपी असिम जब्बार शेख व छोट्या हरुन शेख हे फीर्यादी जवळ आले व शिवीगाळ करु लागले व तु सोमनाथ मोहळकर सोबत वाद का घालतो, असे म्हणुन लाथाबूक्याने मारहाण करण्यास केली.

यानंतर आरोपी छोट्या हारुन शेख याने तेथे असलेला मटन तोडण्याचा लाकडी ठोकळा उचलुन फीर्यादी विक्रम कोळी याच्या डोक्यात घालुन गंभीर जखमी केले. तसेच सोमनाथ मोहळकर याने फीर्यादीस पाठीवर लाथ मारुन तसेच हाताने तोंड़ावर मारहाण केली, त्यावेळी फीर्यादीचा भाऊ रमेश कोळी हा भांडण सोडवण्यासाठी मध्ये आला असता त्यास सोमनाथ मोहळकर याने लाथाबुक्याने मारहाण केली व असिफ शेख व छोट्या शेख यांनी त्यास शिवीगाळ केली. तसेच तुम्ही आमच्या नादी लागले तर तुम्हाला संपवून टाकीन अशी धमकी दिली.

या प्रकरणी फीर्यादी विक्रम बबन कोळी रा. पोतेवाडी, ता. जामखेड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सोमनाथ भरत मोहळकर, असिफ जब्बर शेख व छोट्या हरुन शेख सर्व रा. नान्नज ता. जामखेड यांच्या विरुध्द जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सदर जखमींची परीस्थिती चिंताजनक असुन देखील पोलिसांनी आरोपींन विरोधात योग्य ते कडक कलम लावले नाही. साधे कलम लावुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर आरोपी हे गावगुंड व नगड प्रवृत्तीचे आहेत. त्यांच्या पासुन आमच्या जीवाला धोका आहे. त्यांच्या कडुन अशा स्वरुपाच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करुन तीनही आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी जखमीचे नातेवाईक महेश कोळी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एस डी लोखंडे हे करीत आहेत.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा