गावातील पावसाच्या पाण्याचा व्हीडिओ सोशल मिडियावर केला व्हायरल, सरपंच पतीची ग्रामस्थाला शिविगाळ

- Advertisement -spot_img

जामखेड प्रतिनिधी

शिऊर जवळील फाळकेवाडी येथील शाळेजवळील ओढ्यामध्ये पावसाचे पाणी वाढल्याने मुलांना शाळेत येण्यास आडचण निर्माण झाली. यामुळे एका ग्रामस्थाने याचा व्हीडिओ काढुन सोशल मिडियामध्ये शेअर केला.

याच कारणावरून सरपंच पती गौतम (आण्णा) उतेकर यांनी फीर्यादीस माझी बदनामी का केली असे म्हणुन मोबाईलवरून शिवीगाळ केली. या प्रकरणी शिरूरचे सरपंच पती गौतम (आण्णा) उतेकर यांच्या विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला अदाखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की फीर्यादी दत्तु परमेश्वर फाळके, बिंडावस्ती, फाळकेवाडी यांनी या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. याबाबत त्यांनी फीर्यादीत म्हंटले आहे की शिऊर गावाजवळील फाळकेवाडी येथे  एक शाळा आहे. शाळेजवळील ओढ्यामध्ये पावसाचे पाणी वाढल्यामुळे मुलांना शाळेत येण्या जाण्यासाठी आडचण निर्माण झाली होती.

या बाबत चा व्हीडिओ फीर्यादी दत्तु परमेश्वर फाळके यांनी काढला व तो व्हीडिओ सोशल मिडियावर व्हायरल केला. यानंतर गौतम उतेकर यांनी या कारणावरून फीर्यादी यांना फोन करून सोशल मिडियावर व्हिडिओ का टाकला असे म्हणुन तु माझी बदनामी का केली? असे म्हणुन म्हणुन फीर्यादीस शिविगाळ केली. या प्रकरणी फीर्यादी दत्तु फाळके यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून शिऊर गावचे सरपंच पती गौतम (आण्णा) उतेकर यांच्या विरोधात अदाखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रार दाखल करते वेळी फाळकेवाडी व बिंडावस्ती येथील दत्ता परमेश्वर फाळके, शांतीलाल सुखदेव फाळके, मच्छिंद्र दादा फाळके, दिपक दत्तु इंगवले, बाबु फाळके, विठ्ठल पंढरीनाथ चव्हाण, संतोष आरेकर, मंगेश भिकाजी आरेकर, नाना फाळके, भाऊ फाळके व नाना यादवराव देवकाते यांच्यासह आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा