जामखेड चे पोलिस कर्मचारी धनंजय नरेश गुडवाल व महादेव काळे या दोघांचा आगीत होरपळून मृत्यू
जामखेड प्रतिनिधी –



जामखेड-बीडरोडवर एका धावत्या कारला आग लागल्याने एकच खळबळ उडाली. आज पहाटे हा अपघात घडला असून यात दोघांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. यातील एक जण पोलिस अधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. दोघेही जामखेडचे रहिवासी असून बीडकडून जामखेडला येत असताना हा अपघात झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार जामखेड-बीडरोवरील नवले पेट्रोल पंपाजवळ पहाटे चार वाजता चालत्या चारचाकी वाहनाने पेट घेतला. यात पोलिस कर्मचारी धनंजय नरेश गुडवाल, आणि त्यांचासह असलेला महादेव काळे या दोघांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.


