जिल्हाधिकारी यांना निवेदन देत केली मागणी..

जामखेड प्रतिनिधी
जामखेड तहसील कार्यालयात आज रोजी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या उपस्थितीत विविध विभागांची आढावा बैठक संपन्न झाली

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष बापुसाहेब शिंदे यांनी शेती पिकांचे पंचनामे करण्याबाबत चे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले या निवेदनात
जामखेड तालुक्यातील शेतातील खरीप हंगामातील उडिद, मुग, सोयाबीन, कापुस, तुर, कांदा इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे

तसेच खोड माशी, चक्री भुंगा या किडीच्या प्रादुर्भावामुळे व पावसातील खंड व मागील दहा दिवसापासून सतत पडणाऱ्या पाऊसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट मोठ्या प्रमाणात ओढावले गेले आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिक नुकसानीचे पंचनामे करून तातडीने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी तसेच पिकविमा कंपन्यांनी पंचनामे करून शेतकऱ्यांना विम्याची रक्कम दयावी याबाबत जिल्हाधिकारी यांनी या शेतकऱ्यांच्या मागणी कडे सहानुभूती पुर्वक लक्ष घालावे या आशयाचे निवेदन देण्यात आले.



