लोकमान्य शाळेतील गणेशाची बाफनांच्या हस्ते करण्यात आली आरती

जामखेड प्रतिनिधी
आदर्श फाउंडेशन अध्यक्ष आकाश बाफना यांनी लोकमान्य शाळा जामखेड येथे भेट देऊन गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घेतले व त्यांच्या हस्ते शाळेतील गणेशाची आरती संपन्न झाली सालाबाद प्रमाणे या शाळेत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे विद्यार्थींनी ढोल ताशा व लेझीम पथकाच्या निनादात मान्यवरांचे स्वागत केले व चिमुकल्यांसोबत श्री गणेशाची आरती बाफना यांच्या हस्ते संपन्न झाली संस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीने मान्यवरांचा सन्मान करण्यात आला

लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक स्वरूप दिलेल्या या उत्सवामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात समाजजोडणीची आणि राष्ट्रभावनेची नवी ऊर्जा निर्माण झाली आहे.
आपल्या महाराष्ट्रासह संपूर्ण देश प्रगती, ऐक्य आणि समृद्धीच्या मार्गावर वाटचाल करो. हीच श्री गणराया चरणी उपस्थित मान्यवर शिक्षक संचालक व विद्यार्थींनी प्रार्थना केली आहे


या प्रसंगी बोलताना अकाश बाफना म्हणाले की जामखेड शहरातील गुणवत्ता व कलागुणांनी संपन्न असलेली लोकमान्य प्राथमिक शाळा मोठ्या उत्साहामध्ये सर्व उत्सव साजरे करत असतात या ठिकाणी विशेष म्हणजे विश्वस्त मंडळ हे अतिशय तत्पर व विद्यार्थ्यांच्या बाबतीत काळजीपूर्वक आहे तसेच मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक वृंद अतिशय पालकाप्रमाणे विद्यार्थ्यांवर लक्ष देतात त्यामुळेच गुणवत्ता व विविध क्षेत्रांमध्ये आज जामखेड शहरामध्ये लोकमान्य शाळा ही नावारूपाला आलेली आहे.
यावेळी आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष अकाश बाफना,संस्थेचे पदाधिकारी उमेश(काका)देशमुख,राजेंद्र देशपांडे, शाळेच्या मुख्याध्यापिका मिनाताई राळेभात,भाजपाचे युवा नेते शिवकुमार डोंगरे यांच्यासह शाळेचे शिक्षक विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते



