पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पथकाचा जामखेड मध्ये अवैध धंद्या विरोधात कारवाईचा धडाका सुरूच

- Advertisement -spot_img

संशयित रित्या फिरणाऱ्या सहा जणांनसह, नियम मोडणाऱ्या एका कलाकेंद्रा विरोधात कारवाई

जामखेड प्रतिनिधी

परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक संतोष खाडे यांच्या विशेष पथकाने जामखेड परिसरातील अवैध धंद्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. काल दुपारी दोन हाॅटेल मध्ये अवैध दारू विक्री विरोधात कारवाई केली होती तसेच रात्री नियमापेक्षा जास्त वेळ चालू असलेल्या कलाकेंद्र मॅनेजर विरोधात व गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयित रित्या फिरणाऱ्या सहा जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. यामुळे अवैध धंदे वाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

जामखेड शहरामध्ये रात्रगस्त पेट्रोलिंग व कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान ०६ इसमांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ अन्वये व ३३ (w), १३१ प्रमाणे कलाकेंद्र मॅनेजर विरुद्ध कारवाई  पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या विशेष पोलीस पथकाची कामगिरी केली आहे.

सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी विशेष पथक तयार करुन अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध्य धंद्यांविरुद्ध कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत. वरील नमुद आदेशाप्रमाणे परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक  संतोष खाडे हे जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत पोलीस अधीक्षक यांचे विशेष पोलीस पथकासह रात्रगस्त पेट्रोलिंग करीत असताना पेट्रोलिंग दरम्यान ०६ इसम गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयास्पद फिरताना मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचेविरुद्ध जामखेड पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ प्रमाणे कारवाई करण्यात आली.

ताब्यात घेण्यात आलेल्या इसमांची नावे खालीलप्रमाणे. १) गणेश प्रभाकर चव्हाण, वय-२९ वर्षे, रा. सावरगाव मारुती, ता. जामखेड जि. अहिल्यानगर २) स्वप्निल नामदेव थोरात, वय ४० वर्षे, रा. सावरगाव मारुती, ता. जामखेड जि. अहिल्यानगर ३) शुभम सुर्यभान चव्हाण, वय २४ वर्षे, रा. सावरगाव मारुती, ता. जामखेड जि. अहिल्यानगर ४) देविदास रावसाहेब पवार, वय ३५ वर्षे, रा. लेनवाडी ता.जामखेड जि. अहिल्यानगर ५) सत्यजित भागवत शेंडगे, वय २१ वर्षे, रा. गेवराई जि. बीड
६) आदित्य रामप्रसाद गजमल, वय २३ वर्षे, रा. निमगाव ता. गेवराई जि. बीड अशी नावे आहेत.


तसेच रात्रगस्त पेट्रोलिंग करीत असताना जामखेड – बीड रोडवरील स्वरराज कला केंद्र हे शासनाने ठरवुन दिलेल्या निर्धारीत वेळेपेक्षा अधिक वेळ चालु असल्याचे दिसुन आल्याने  मॅनेजर विश्वास बाबुजी जाधव, वय – ३४ वर्षे, रा. जामखेड जि. अहिल्यानगर यास ताब्यात घेवुन त्याचेविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम-३३ (W), १३१ प्रमाणे कारवाई केली.

सदरची कामगिरी सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर,  प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर विभाग अहिल्यानगर, सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस अधीक्षक यांचे विशेष पथकाचे प्रभारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे, अहिल्यानगर शहर विभाग, पोसई राजेंद्र वाघ, पोहेकॉ शंकर चौधरी, पोहेकॉ अजय साठे, पोहेकॉ मल्लीकार्जुन बनकर, पोहेकॉ  दिगंबर कारखिले, पोहेकॉ उमेश खेडकर, पोकॉ सुनिल दिघे, पोकॉ अमोल कांबळे,पोको संभाजी बोराडे यांचे पथकाने केली आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा