आपल्या माणसांची शब्बासकीची थाप ही पुढील कार्यासाठी ऊर्जा देणारी आसते:अजय काशीद

जामखेड प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाची कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली आणि अदर्श गाव सारोळा काटेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच तथा भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष व सभापती प्रा.राम शिंदे यांचे शिलेदार अजय काशिद यांची जिल्हा उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे

या निमित्ताने काटेवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला आहे प्रा.राम शिंदे यांच्या मंत्रीपदाच्या काळात अजय काशीद यांनी ग्रामपंचायतच्या माध्यमातून मोठी विकासकामे मार्गी लावली आहेत विशेषतःताह जलसंधारणाच्या माध्यमातुन नदी खोलीकरण व बंधाऱ्यांमुळे गावात मोठ्या प्रमाणावर पाणी साठवले गेले आणी गाव टॅंकर मुक्त झाले याबद्दल तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी जलयुक्तांच्या कामांना भेट देऊन अजय काशीद व ग्रामस्थांचे कौतुक केले होते

तसेच काटेवाडीला पक्का डांबरीकरणाचा रस्ता करून दळणवळणाची आडचण सोडवली तसेच ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध विकास कामांच्या योजना प्रभावीपणे राबविल्याबद्दल व जिल्हा उपाध्यक्षपदी निवड बद्दल ग्रामस्थांनी काशिद यांचा सन्मान केला

यावेळी बोलताना अजय काशीद म्हणाले की आपल्या माणसांची शाब्बासकीची थाप व केलेला सन्मान हा भविष्यात सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करण्यासाठी प्रेरणा देत आसतो पुढील काळात काटेवाडी गावातील ज्या समस्या व राहिलेले विकासकामे विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या माध्यमातून नक्कीच पुर्ण करू आसाच आशिर्वाद व प्रेम ग्रामस्थांकडून मिळावे अशी भावना व्यक्त केली.

यावेळी भाजपाचे पदाधिकारी युवक कार्यकर्ते व काटेवाडी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते


