आदर्श फौंडेशनचे अध्यक्ष अकाश बाफना यांनी केले बाल दिंडींचे स्वागत..

- Advertisement -spot_img

चिमुकल्यांच्या दिंडीत सहभागी होऊन घेतला आनंद,बाफना परिवार जपतो आहे वारकरी संप्रदायाचा वारसा..

जामखेड प्रतिनिधी
बाफना परिवारास वारकरी संप्रदायाचा वारसा आहे गेली आनेक वर्षे जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन मा.चेअरमन व तालुक्याचे जेष्ठ नेते दिलीप बाफना हे कार्तिक एकादशीला जामखेड ते पंढरपूर पायी दिंडी आयोजन करतात जामखेड शहरात राज्यातील तत्कालीन नामांकित किर्तनकार वै.बाबा महाराज सातारकर यांच्या किर्तनसेवा जामखेडकरांना बाफना परिवाराच्या माध्यमातून श्रवण करता आल्या

आणि हाच वारसा अदर्श फौंडेशनचे अध्यक्ष अकाश बाफनाही पुढे चालवत आहेत निमीत्त होते जामखेड शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले व मुली दिंडी सोहळ्याचे ..

ही शाळा तालुक्यातील एक नावाजलेली शाळा असून शालेय शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकी , सर्व धर्म समभाव अशी वृत्ती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे  अशा पद्धतीचे शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचे काम सर्वच शिक्षक करत आहेत

तसेच विद्यार्थींना आपली संस्कृती वारकरी संप्रदाय पायी दिंडीसोहळा रिंगण सोहळा पांडुरंगाच्या भेटीची आस ही आपली परंपरा बाल मनावर रूजली पाहिजे या उद्देशाने दिंडींचे आयोजन करण्यात आले होते.

या दिंडीत वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुलं पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर अशा वातावरणात जामखेड शहर आणि परिसरात शाळेचा बाल दिंडी सोहळा रंगला.

आणि अकाश बाफनांना आठवले आपले बालपण…
कार्तिकी एकादशीच्या निमीत्ताने आयोजीत दिंडीत अकाश हे वारकरी पेहराव परिधान करून खांद्यावर भगवी पताका घेत दिंडीत सहभागी होत आसत काल अशाच चिमुकल्यांची दिंडी निघाल्यानंतर त्यांनाही आपले बालपण आठवले

आकाश शेठ बाफना यांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध स्तुत्य उपक्रमांचे कौतुक केले. आणि आषाढी एकादशीच्या निमित्ताने शहरातुन काढण्यात आलेल्या या बाल दिंडीमुळे संपुर्ण शहरात आनंदी व भक्तीमय वातावरण झाले आहे. या दिंडीतुन विद्यार्थी नक्कीच प्रेरणा घेतील  असे मत आकाश शेठ बाफना यांनी व्यक्त केले व सर्वांना शुभेच्छा दिल्या..

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा