विठ्ठल महाराज मंत्री यांची झाली किर्तनसेवा

जामखेड प्रतिनिधी
संत वामनभाऊ महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत ह. भ. प. रघुनाथ महाराज चौधरी धामणगाव व वैराग्य मुर्ती ह. भ. प. कैलास महाराज भोरे यांच्या कृपा आशिर्वादाने जामखेड तालुक्यातील मौजे जमादारवाडी
येथे गेली ३१ वर्षे भव्य दिव्य अशा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते सप्ताहाचे हे ३२ वे वर्ष आहे मोठ्या भक्तीमय वातावरणात हा नामयज्ञ सुरू झाला आहे

विना पुजन करून ग्रंथराज ज्ञानेश्वरीचे पारायणानंतर दुपारी गाथा भजन झाले आणी सायंकाळी चार ते पाच रामकृष्ण हारी जप करण्यात आला

प्रथम दिवशीची किर्तनसेवा भागवताचार्य विठ्ठल महाराज मंत्री यांची संपन्न झाली
मूत्युलोकी आम्हा आवडती परी!
नाही एका! हारिनामे विण!
विटलेहे चित्त प्रपंचापासुनी!
वमन ते मनी बैसलेसे!!
जगद्गुरु तुकोबाराय यांच्या आभंगावर चिंतन मांडले मनुष्य जिवाने परमार्थीक साधना करून दुर्लभ आसा मिळालेल्या देहाचे सार्थक करावे भगवंताने आपल्याला त्याची भक्ती करण्यासाठी हे इंद्रिय दिले आहेत हेच आपण विसरलो आहोत म्हणून संतानी समाजाच्या उध्दारासाठी आपले जिवन व्यतीत केले आसल्याचे त्यांनी सांगितले

किर्तनासाठी गायक वादक टाळकरी यांनी साथ केली, तर संत तुकाराम महाराज सेवा मंडळाची सेवा अत्यंत उत्कृष्ट नियोजनाने पार पडली
दररोज ७ ते ९ किर्तन व त्यानंतर सर्व भाविकांसाठी मिष्टांन्न भोजनाची व्यवस्था जमादारवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे

सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम
पहाटे ४ ते ६ काकडा भजन, ६ ते ७ विष्णु सहस्र नाम ७ ते १० ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण ११ ते १२ गाथा भजन ४ ते ५ रामकृष्ण हारी जप ५ ते ६ हरिपाठ ७ ते ९ किर्तन व नंतर हरिजागर
तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या नाम सप्ताहसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आशी विनंती जमादारवाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे
तरी पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी श्रवणाचा व भोजनाचा लाभ घ्यावा असे आवाहन जमादारवाडी ग्रामस्थांनी केले आहे



