सर्व व्यक्ती कायद्यासमोर समान- न्यायाधीश व्ही व्ही जोशी

- Advertisement -spot_img

बालिका दिनानिमित्त कायदे विषयक  जनजागृती शिबीर नागेश विद्यालय उत्साहात संपन्न.

जामखेड प्रतिनिधी

तालुका विधी सेवा समिती, वकील संघ जामखेड व रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश विद्यालय ज्यूनियर कॉलेज व कन्या विद्यालय जामखेड यांच्या संयुक्त विद्यमाने बालिका दिना निमित्त  बेटी बचाव बेटी पढाओ,  बाल सेवा विधी व त्याचे संरक्षण योजना  २०२४, पोक्सो कायदा या विषयी कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन नागेश विद्यालयात करण्यात आले.


      या कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ मासाहेब ,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील व  यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष न्यायाधीश व्ही. व्ही. जोशी, प्रमुख उपस्थिती न्यायाधीश श्रीमती ए बी फ़ंड, एडवोकेट जी आर डोके मॅडम, तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड. प्रमोद राऊत,अॅड नागरगोजे , अॅड.कात्रजकार पी के , अॅड हर्षल डोके
प्राचार्य मडके बी के, मुख्याध्यापक संजय हजारे, पर्यवेक्षक कोकाटे व्ही के. एनसीसी ऑफिसर मयुर भोसले, अॅड बाळासाहेब घोडेस्वार, अॅड विटकर,
गुरुकुल प्रमुख संतोष ससाणे,
प्रा विनोद सासवडकर, प्रा कैलास वायकर, सौ साळुंके मॅडम, सौ शिंदे मॅडम,  श्री. राजेश जाधव सर , श्री. सागर ढगे सर ,  साळुंके बी एस, संभाजी इंगळे,रघुनाथ मोहळकर, बडे सर,पोकळे सर,
  नागेश विद्यालय ,कन्या विद्यालय व ज्यूनिअर कॉलेज मधील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक, शिक्षिका स्टाफ , एनसीसी कॅडेट उपस्थित होते.
     
एडवोकेट नागरगोजे यांनी मुलींनी शिक्षण घेत असताना शासकीय योजनांचा फायदा घ्यावा तसेच बालविधी सेवा  कायदा 2024 याची माहिती दिली.
    श्रीमती डोके मॅडम बेटी बचाव बेटी पढाव मध्ये सर्वांनी योगदान द्यावे तसेच अन्याय होत असेल 1098 हेल्पलाइन नंबर वापर करून तात्काळ मदत मिळवा अशी माहिती दिली.

न्यायाधीश ए बी फंड मॅडम यांनी राष्ट्रीय बालिका दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या .आई वडील नेहमीच मुला मुलींना शिकण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. लग्नासाठी पैसे ठेवण्यापेक्षा मुलींच्या शिक्षणासाठी पालकांनी पैसा खर्च करावा. पोक्सो  कायद्याची माहिती दिली असे मनोगत व्यक्त केले.

    कार्यक्रमाचे अध्यक्ष न्यायाधीश व्ही व्ही जोशी यांनी मुलींचे शिक्षण आवश्यक आहे मुलगी दोन्ही घरांना पुढे घेऊन जाते.
शाळेमध्ये मुलींच्या संरक्षणासाठी वेगवेगळ्या उपाययोजना कराव्यात.
मुलींना कोणी छेडछाड पाठलाग किंवा त्रास देत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली जाते . मुलींनी तक्रार देण्यासाठी पुढे यावे .गुन्हा घडत असेल तर आवाज उठवला पाहिजे सर्व व्यक्ती कायद्यासमोर समान आहेत. विधी सेवा अंतर्गत विद्यार्थ्यांना मदत केली जाते असे मनोगत व्यक्त करून बालिका दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य मडके बी के यांनी केले तर
सूत्रसंचालन स्वाती अभंग व संभाजी देशमुख तर आभार  प्रदर्शन मुख्याध्यापक संजय हजारे यांनी केले.
         विधी सेवा अंतर्गत विद्यार्थ्यांना मदत केली जाते.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा