पावसात पूल गेला वाहून,ग्रामस्थ व विद्यार्थींच्या मदतीला आली आहे बोट.

- Advertisement -spot_img

खेड-शिंपोरा मार्गावर रस्ता ओलांडण्यासाठी आ. रोहित पवार यांच्या प्रयत्नांतून बोटीचा पर्याय

जामखेड प्रतिनिधी

कर्जत तालुक्यातील खेड-शिंपोरा रस्त्यावरील बारा वर्षांपूर्वीच्या वाहून गेलेल्या जुन्या पुलाच्या ठिकाणी पर्यायी वाहतुकीसाठी आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नांतून बोट उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील नागरीक, शेतकरी, व्यावसायिक आणि विद्यार्थी यांची गैरसोय दूर झाली आहे.

मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने आलेल्या पुरात खेड-शिंपोरा रस्त्यावरील १२ वर्षांपूर्वीचा पूल वाहून गेला होता. यामुळे या भागातील खेड, शिंपोरा, मानेवाडी, बाभुळगाव दुमाळा या गावांची अडचण झाली होती. वाहून गेलेल्या पुलाच्या जागी दुसरा प्रशस्त आणि भक्कम पूल उभारण्यासाठी आमदार रोहित पवार यांचा सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे.

परंतु सध्या पावसाळा सुरु असल्याने पुढील काही दिवसांत हे काम तातडीने होणे शक्य नाही. तोपर्यंत लोकांसाठी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक होते. कारण अनेक विद्यार्थीही दररोज या मार्गाने प्रवास करत असतात. म्हणून सध्या तात्पुरत्या स्वरुपात बोटीची पर्यायी व्यवस्था करण्यात आली.

आपत्कालीन परिस्थितीत वापरता यावी आणि पर्यटनासाठी फायदा व्हावा या हेतूने गेल्या टर्ममध्ये आमदार रोहित पवार यांनी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून सिद्धटेकसाठी बोट उपलब्ध करुन दिली होती. याच बोटीची आवश्यक ती दुरुस्ती करून कालपासून ही बोट खेड-शिंपोरा रस्त्यावरील वाहून गेलेल्या पुलाच्या ठिकाणी नागरिकांची वाहतूक करण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात आली. बोट चालकाचा खर्च हा आमदार रोहित पवार यांच्यामार्फत करण्यात येणार असून इंधनाचा खर्च हा शिंपोरा, बाभुळगाव दुमाला आणि मानेवाडी ग्रामपंचायतीकडून एकत्रितपणे करण्यात येणार आहे. ही बोट सुरु करण्यासाठी सिद्धटेकच्या सरपंच सौ. लताताई सोमनाथ सांगळे, मा. उपसरपंच हनुमंत भोसले, रोहित सांगळे यांच्यासह स्थानिक कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. यामुळे शिंपोरा, खेड, बाभुळगाव दुमला आणि मानेवाडी येथील शेतकरी, व्यावसायिक, नागरिकांसह विद्यार्थ्यांचीही गैरसोय दूर झाली.

चौकट
वाहून गेलेल्या पुलाच्या जागी भक्कम पुल उभारण्यासाठी माझा पाठपुरावा सुरु आहे, पण तोपर्यंत नागरिकांची अडचण होऊ नये म्हणून ही बोट तात्पुरत्या स्वरुपात सुरु करण्यात आली. त्यासाठी बोट उपलब्ध करुन दिल्याबद्दल सिद्धटेक ग्रामपंचायतीचे आणि स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार! बोट चालवताना सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून यामुळं स्थानिक ग्रामस्थ आणि विद्यार्थांची गैरसोय दूर होण्यास निश्चितच मदत होईल.
रोहित पवार
आमदार, कर्जत-जामखेड

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा