पैसा कमविणाऱ्यांना भारतरत्न मिळतो, उपाशी राहून समाजासाठी लढणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याची गरज – ॲड.अरुण जाधव…
जामखेड प्रतिनिधी

औषध घरपोच कुरिअरने मिळेल औषधाची किंमत फक्त रुपये 5500₹ त्याच्यामध्ये तुम्हाला 90 दिवसांची औषधे मिळतात आणि सोबत 90 दिवसांची औषधे मोफत मोफत मोफत ऑफर फक्त आजच गरजूंनी लाभ घ्यावा..
शंभर टक्के प्रभावी आणि गुणकारी आयुर्वेदिक औषध कोणतेही केमिकल नाही डायटिंग व्यायाम करण्याची गरज नाही घरबसल्या खाऊन पिऊन वजन कमी करा..
▪️आजच फोन करा नाव पत्ता व्हाट्सअप करावा मोबाईल नंबर 7387447577
👉 वरील नंबर वर फोन करा व पत्ता व्हाट्सअप करावा औषध पाच दिवसात तुम्हाला घरपोच कुरिअरने मिळेल.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ वी जयंती निमित्त खर्डा रोड जामखेड येथील साठे नगर येथे जयंतीनिमित्त बोलताना ॲड. अरुण आबा जाधव म्हणाले की , माणूस कोणत्या कुळात कुठल्या वर्गात जन्माला येतो याच्या पेक्षा त्याचे कर्तृत्व किती मोठे आहे. याच्यावर तो माणूस किती श्रेष्ठ आहे. हे कळतं या व्यवस्थेने ज्याला अस्पृश्य ठेवलं गावाच्या बाहेर ठेवले. कुठल्याही प्रकारचे ज्ञान घेता येत नाही लिहीता येत नाही. तुम्ही अस्पृश्य आहे असे म्हणून ज्यांना हिनवलं अशा परिवारामध्येच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पहिला पोवाडा महात्मा जोतिबा फुले यांनी लिहिला तर अण्णाभाऊ साठे यांनी तो गायला अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेले साहित्य साता समुद्रा पलिकडे विदेशात गेले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी देशातील गोरगरीब, शेतकरी, कामगार, महीला अशा विविध क्षेत्रातील तळागळातील वंचिताच्या व्यथा वास्तव व्यवस्थेकडे मांडण्याचे काम त्यांनी आपल्या लेखणीतून केले.
पैसा कमविणाऱ्यांना भारतरत्न मिळाले परंतु शिळे तुकडे खाऊन समाजासाठी लढणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सारख्या थोर साहित्यिकांला भारतरत्न मिळाले नाही याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली. चांगलं काम करणाऱ्या महामानवाच्या विचार वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी नवं युवकांना पुढे येण्याची गरज आहे.

तसेच न्याय व्यवस्थेवर प्रखर पणे लिहून लोकांचे प्रश्न मांडण्याचे काम लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यानी केले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात यावा अशी मागणी देखील यावेळी त्यांनी केली.

जामखेड तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मा. दशरथ चौधरी यांनी महापुरुषांचे विचार आचरणात आणले तर पोलिस खात्याची गरजच पडणार नाही. या महापुरुषांच्या विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी ॲड.अरूण जाधव,सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले,नगरसेवक अमित चिंतामणी, उपनगराध्यक्ष महेश दादा निमोणकर , नगरसेवक पवनराजे राळेभात, नगरसेवक गणेश आजबे, संजय काशिद, तात्यासाहेब बांदल, जमीर सय्यद, कृषी उत्पन्न बाजार समिती चे मा. संचालक सागर सदाफुले, सचिन अण्णा सदाफुले, नगरसेवक मोहन पवार, संतोष गव्हाळे, विकी घायतडक सर, सामाजिक कार्यकर्ते नासीर चाचू सय्यद , विक्रांत घायतडक, राज शिंदे, मनोज डाडर, आदी मान्यवर उपस्थित होते.

तर सागर सदाफुले, मोहन पवार, जमीर सय्यद, महेश निमोणकर, गणेश आजबे, पवनराजे राळेभात, संजय काका काशिद, अमित चिंतामणी, विकी घायतडक सर आदींची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले यांनी केले. शरद मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी किशोर काबंळे,शरद मोरे,दत्तात्रय क्षीरसागर, रवी डाडर,नितीन डाडर, संतोष थोरात , सचिन कांबळे , शेखर मोरे, दादा डाडर , करण डोलारे , संतोष थोरात लखन गाडे, लखन मोरे कृष्णा कांबळे , जितेश डाडर, दादा अडागळे, गणेश वाघमारे, सोनु क्षीरसागर, बाळासाहेब डाडर, व अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती च्या सर्व सदस्यांनी विशेष परीश्रम घेतले.


