जिल्हा सहकारी बँकेला सभापती प्रा.राम शिंदेंचा पडला विसरं.

- Advertisement -spot_img

भाजपाचे कार्यकर्ते झाले अक्रमक,जामखेड शाखेसमोर केला निषेध.

जामखेड प्रतिनिधी

जामखेड तालुका भारतीय जनता पार्टी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या वतीने सन २०२४/२५ या आर्थिक वर्षाचा ताळेबंद अहवाल प्रकाशित करण्यात आलेला होता.

मात्र या ताळेबंद अहवालात महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती मा. नामदार प्रा. राम शिंदे यांचा छायाचित्र (फोटो) नसल्याने भारतीय जनता पार्टीच्या वतीने जामखेड येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेसमोर जाहीर निषेध करण्यात आला.

या निषेध आंदोलनावेळी भाजपा ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, माजी सभापती डॉ.भगवान मुरूमकर, बाजार समितीचे सभापती पैलवान शरद कार्ले, उपसभापती नंदकुमार गोरे, ग्रामीण मंडळ तालुका अध्यक्ष बापूराव ढवळे, शहर मंडळ अध्यक्ष संजय काशिद, पांडुरंग उबाळे, संचालक वैजिनाथ पाटील, संचालक रविंद्र हुलगुंडे, संचालक सचिन घुमरे, संचालक नारायण जायभाय, संचालक राहुल बेदमुथ्था, संचालक गौतम उतेकर, संचालक डॉ. गणेश जगताप,मोहन (मामा) गडदे, नगरसेवक अमित जाधव, तात्याराम पोकळे, गोरख घनवट, उध्दव हुलगुंडे, मोहन देवकाते, उदयसिंह पवार, डॉ. जयराम खोत, रखमाजी मुंडे, महालिंग कोरे, राजेंद्र ओमासे, चेअरमन अशोक महारनवर, सरपंच महारुद्र महानवर, जालिंदर चव्हाण, सुशिल आव्हाड, राहुल चोरगे, डॉ अल्ताब शेख,अजय सातव,भैय्या थोरात, गणेश लटके, श्रीराम डोके, संदीप जायभाय, बाळासाहेब गोपाळघरे, मा. ऋषिकेश नेरकर, राजू गोरे, कल्याण शिंदे, किरण जाधव, मिलिंद देवकर, संजय बेरड, अन्सार पठाण,भारत ढवळे, बाबासाहेब फुलमाळी, पृथ्वीराज भोसले, भारत उगले, मलिकभाई, अंगद गव्हाणे, चेअरमन मगन बहीर, गौतम को ल्हे, विशाल भांडवलकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निषेधादरम्यान जिल्हा बँक प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत अहवालातील सभापतींचा फोटो प्रकाशित न केल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बँक प्रशासनाने तात्काळ सभापतींचे छायाचित्र समाविष्ट करावे अशी मागणी केली.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा