श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यात्रा उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न

- Advertisement -spot_img

देवावरील श्रध्देच्या भावनेतून आनेक भक्तगण नाथम्हस्कोबाच्या दर्शनसाठी येतात:दादा महाराज करगळ

जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील हळगाव परिसरात करगळ वस्ती या ठिकाणी श्रीनाथ म्हस्कोबाचे भव्य आसे मंदिर आहे या ठिकाणी सालाबाद प्रमाणे यात्रा उत्सवानिमित्त दोन दिवस धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते
या ठिकाणी पारंपारिक ढोल ताशा सनई ब्रॅण्ड पथकाच्या निनादात देवाची सजवलेल्या पालखी मध्ये मिरवणूक काढण्यात आली या नंतर मानाचे मानकरी यांच्या हस्ते देवाला हळद लावून नाथम्हस्कोबाचा व माता जोगेश्वरीचा विवाह सोहोळा संपन्न झाला व यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाने आयोजन करण्यात आले होते यानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात देवाचा छबिना निघाला देवाच्या घोषणांनी व फटाक्यांच्या आतिषबाजीत परिसर दुमदुमून गेला होता हजोरो भाविक यावेळी उपस्थित होते


    या प्रसंगी बोलताना मानकरी दगडु शिंगाडे म्हणाले की देवावरील श्रध्देपोटी भाविकांचा ओघ दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे दादा महाराज करगळ यांचे कार्य चांगले आहे भाविकांना त्यांनी भक्तीमार्ग दाखवला आहे
त्यामुळे येणाऱ्या काळातही करगळ महाराज भाविकांची सेवा करतील आशी मनोकामना त्यांनी व्यक्त केली तसेच या उत्सवात या वर्षीचे भाकित वर्तवले जाते पाऊस कोणत्या नक्षत्रात किती पडणार आहे शेतकऱ्यांनी कोणते पिक घेतले पाहिजे येणाऱ्या काळात काय खबरदारी घेतली पाहिजे आसे भाकित सांगितले जाते आणि यावर शेतकरी बांधवांचाही विश्वास आसल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.


      या देवस्थानचे प्रमुख दादामहाराज करगळ बोलताना म्हणाले की या ठिकाणी मानाचे सर्व मानकरी आमच्या विनंतीला मान देऊन दर वर्षी येतात व हा उत्सव पार पाडतात आणि मानकरी हा या कार्यक्रमाचा मुख्य घटक आहे ते जे बोलतात त्याच पध्दतीने आम्ही धार्मिक कार्यक्रम करत आहोत तसेच विविध भागातून येणाऱ्या भाविकांच्या मदतीने हे तिर्थक्षेत्राचा विकास झाला आहे या ठिकाणी श्रध्देने भाविक येतात व देवाला साकडे घालतात त्यामुळे त्यांच्या जिवनातील आडचणी सुटतात त्यासाठी भाविकांनी देवावर भाव ठेवला पाहिजे याठिकाणी येणारे सर्व मानकरी भाविक भक्तांचे त्यांनी आभार मानले
     या वेळी या कार्यक्रमाचे मानकरी दगडु शिंगाडे, नाना तरडे, बापु बुरूंगले, लाला व्हटकर, पोपट ढवाण, राऊस जमदाडे, हनुमंत जमदाडे, भाविक कैलास रसाळ, शिवाजी लटपटे, बाळासाहेब वीर, खंडु तांबे, मल्हारी तांबे, यांच्यासह मोठय़ा संख्येने भाविक भक्त उपस्थित होते

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा