वारकरी संप्रदायाचा वारसा जपणं हीच आपली जबाबदारी : आकाश बाफना

- Advertisement -spot_img

श्री नागेश्वर येथील सप्ताहाची सांगता; काल्याचे कीर्तनास भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जामखेड प्रतिनिधी

जामखेडचे ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिर येथे नागपंचमीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या २२ वर्षांपासून श्री नागेश्वर सेवा समितीच्या वतीने ही अध्यात्मिक परंपरा अविरत सुरू आहे.

या वर्षी काल्याच्या कीर्तनासाठी प्रमुख सेवेकरी म्हणून ह.भ.प. चेतन महाराज बोरसे यांची सेवा लाभली. कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या पवित्र कार्यक्रमाचे यजमान शहरातील उद्योजक व आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश दिलीप बाफना आणि बाफना परिवार होते.

कार्यक्रमाच्या सांगता सोहळ्यात आकाश बाफना यांनी बोलताना सांगितले की, वारकरी संप्रदायाचा वारसा आणि सेवाभाव मनामध्ये कायम जागृत असतो. ही सेवा करण्याची संधी आम्हाला मिळणे हे आमचे भाग्य असून, आम्ही ती सेवा अविरतपणे करत राहू.

या वेळी ज्येष्ठ नेते मधुकर राळेभात, बाबासाहेब पोटरे,नगरसेवक दिगंबर चव्हाण, चेअरमन विनायक राउत,संतोष बारगजे, ह.भ.प. पंढरीनाथ राजगुरू,आनंद राजगुरू, निलेश देशमुख यांच्यासह श्री नागेश्वर सेवा समितीचे सदस्य व मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते. सप्ताहभर ज्ञान, भक्ति आणि सेवाभावाची परंपरा जोपासणारा हा हरिनाम सप्ताह यशस्वीरीत्या पार पडला.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा