आखंड हरिनाम सप्ताहातुन पुढच्या पिढीला संस्कार मिळतात:नगरसेवक अमित चिंतामणी

जामखेड प्रतिनिधी
गेली आठ दिवसापासून सुरू आसलेल्या जमादारवाडी येथील भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता ह. भ. प. कैलास महाराज भोरे यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली

यावेळी प्रा.मधुकर आबा राळेभात यांनी बोलताना सांगितले की जमादारवाडी हे गाव बत्तीस वर्ष झाले आखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करत आहे त्यामुळे परमार्थीक साधनेत गावाने आपले तालूक्यात वैभव निर्माण केले आहे आखंड हरिनाम सप्ताहात नव नवीन उपक्रम या गावाने सुरू केल्यामुळे लहान थोर मंडळी सहभागी होत आहेत आसे सांगितले

तसेच नगर सेवक अमित चिंतामणी म्हणाले की गावात आखंड हरिनाम सप्ताह सुरू आसल्याने लहान लहान मुले यात सहभागी होत आहेत टाळ मृदुंगाच्या गजरात जयघोष करत आहेत यामुळेच तर पुढच्या पिढीला हे आध्यात्मिक संस्कार यामाध्यमातून दिले जात आसतात आसे सांगितले

आखंड हरिनाम सप्ताहासाठी गावातील शिवशक्ती तरुण मंडळाचे मोठे योगदान राहिले तसेच महाराष्ट्रातील नामांकित किर्तनकारांच्या किर्तन सेवा संपन्न झाल्या.
प्रा.मधुकर (आबा) राळेभात व अमित चिंतामणी,संपत (नाना) राळेभात,संजय(काका) काशिद,प्रकाश तांबे सर,आनिल श्रीरामे,भाऊ देवकाते,श्रीराम डोके,पवन राळेभात, या मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली त्यांचा सन्मान पंचकमिटीच्या वतीने नगरसेवक गणेश आजबे,आण्णासाहेब नेटके, बाळासाहेब आजबे, अर्जुन नेटके सर, हरिभाऊ आजबे, कैलास नेटके, आनिल नेटके, सुनील आजबे,गौतम आजबे, श्रीराम राळेभात,
पांडुरंग कदम, उध्दव आजबे,किरण आजबे, विठ्ठल वीर, आनिल वीर, यांच्या हस्ते संपन्न झाला.

तर किर्तनसेवेसाठी बळीराम महाराज आसबे, योगेश महाराज आजबे,दादा महाराज आजबे श्रीराम महाराज नेटके दादासाहेब महाराज सातपुते भाऊसाहेब आजबे रघुनाथ शेळके परमेश्वर आजबे रामदास राळेभात विष्णु राळेभात दिलीप आजबे बाळु आजबे गोवर्धन आजबे चैतन्य आजबे यांनी साथ संगत केली तर मृदंगासाठी माऊली महाराज बहीर यांनी साथसंगत केली
गेली आठ दिवस मोठ्या भक्तीमय वातावरणात हा नामयज्ञ संपन्न झाला


