वाढदिवस हे गरजुवंताना साह्यता करून साजरे झाले पाहिजेत : धिरज रसाळ

- Advertisement -spot_img

धिरज रसाळ यांच्या वाढदिवसानिमित्त निवारा बालगृहातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व कपड्यांचे वाटप.

जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यातील दिघोळ/माळेवाडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष तथा युवा उद्योजक धिरज रसाळ यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या सोमवार दि.१८
रोजी निवारा बालगृह मोहा फाटा येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य,किराणा माल, व कपड्यांचे वाटप करण्यात येणार आहे

आपले वाढदिवस साजरे होताना या चंगळवादी दुणेयत मोठ्या प्रमाणावर आणाठाई खर्च होत आहे वाढदिवस जरूर साजरे झाले पाहिजेत पण डाम डोल न करता ते सामाजिक उपक्रम निसर्ग संवर्धन रक्तदान शिबीर तसेच शोषीत वंचित घटकांना मदत करून साजरे झाले तर समाजात चांगला संदेश जातो या संकल्पनेतून धिरज रसाळ यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या निवारा बालगृहातील निराधार विद्यार्थींसाठी किरणा माल शालेय साहित्य व कपडे वाटप करण्यात येणार आहे

याचबरोबर दिघोळ व परिसरात सर्व शाळांमध्ये शालेय साहित्य करण्यात येणार आसल्याचे तंटामुक्ती अध्यक्ष धिरज रसाळ यांनी सांगितले आहे

तसेच कै.रामभाऊ रसाळ यांनी दिघोळ व परिसरात सामाजिक, शौक्षणिक, धार्मिक व क्रिडा क्षेत्रात आपले मोठे योगदान दिले आहे तोच वारसा जपत रसाळ बंधुनी कै. आबासाहेब प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत आणी नागरिकांनी त्यांना मोठा प्रतिसाद दिला आहे

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा