निवारा बालगृहातील निराधारांसोबत पै. धिरज रसाळ यांनी आपला वाढदिवस केला साजरा..

- Advertisement -spot_img

दिघोळ व परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना शौक्षणिक साहित्यांचेही केले वाटप

जामखेड प्रतिनिधी
दिघोळ माळेवाडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष पै. धिरज रसाळ यांनी आपला वाढदिवस निवारा बालगृहातील विद्यार्थींना कपडे,किराणा,शालेय साहित्य वाटप करत त्यांच्या सोबत केक कापुन वाढदिवस साजरा केला.

नविन कपडे शालेय साहित्य व जेवणासाठी गोड पदार्थासाठी किरणा मिळाल्याने विद्यार्थींनी समाधान व्यक्त केले तसेच दिघोळ व परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आबासाहेब प्रतिष्ठानच्या वतीने शालेय साहित्याचेही वाटप करण्यात आले

या प्रसंगी बोलताना पै. धिरज रसाळ म्हणाले की ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृहाच्या माध्यमातून डॉ आरूण जाधव हे मोठ्या प्रमाणावर सामाजिक कार्य करत आसुन ते समाजातील कित्येक निरधार बालकांचा आधार बनले आहेत आणी आपणही या कार्यात काहीतरी खारीचा वाटा उचलावा म्हणुन एक हात मदतीचा या उद्देशाने वाढदिवसाच्या निमित्ताने छोटासा आधार देण्याचा प्रयत्न केला आहे.

आजची पिढी डि. जे. वाजवुन मोठ्या प्रमाणावर फटाके फोडून रस्त्यावर गोंधळ घालत आपले वाढदिवस साजरे करते परंतु आपल्या पुर्वजांनी आपल्याला दिन दुबळ्यांना मदत करावी रंजल्या गांजल्यांची सेवा आपल्या हातुन घडावी तसेच अनाथांना मदत करावी आसे संस्कार घालुन दिले आहेत आणि याच उद्देशाने कै. आबासाहेब प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही सामाजिक कार्य करत आहोत आणी पुढे ते चालु ठेवणार आहोत

निवारा बालगृहातील विद्यार्थींनासोबतचा वाढदिवस हा मला प्रेरणा देणारा ठरणार आहे या बालकांच्या चेहऱ्यावरील समाधानाचे भाव पाहुण खुप आनंद वाटला

यावेळी यावेळी उपस्थित दिघोळ माळवाडी चे उपसरपंच दशरथ राजगुरू,
नागनाथ उमाप,योगेश शिंदे,राहुल टाके बळीराम ढवळे,सागर जाधव,वसंत रसाळ,गणेश आटकरे,रविकिरण गायकवाड,दीपक रसाळ,ओंकार काशीद,अमर कोचाळे,अक्षय राजगुरू ओंकार गायकवाड सुधीर गायकवाड आदी मित्र परिवार उपस्थित होता

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा