भावी अनेक,पण निष्ठावंत एकच अशी ओळख असणारे प्रसन्न कात्रजकर(अध्यक्ष ) उतरणार निवडणूकीच्या आखाड्यात..

- Advertisement -spot_img

शिऊर पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक..

जामखेड प्रतिनिधी

सर्वसामान्यांसाठी सर्वसामान्य कार्यकर्ता जनसेवेचा निर्धार कायम याच वाक्यला आनुसरून एक जिद्दी,निष्ठावंत आणि जनसेवेतून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे नाव म्हणजे प्रसन्न कात्रजकर शिऊर पंचायत समिती गणातून उतरणार आहेत निवडणुकीच्या आखाडय़ात.

समाजकारण आणि जनतेच्या प्रश्नांसाठी नेहमी सज्ज असलेले हा कार्यकर्ता आज सर्वसामान्यांच्या मनात विश्वासार्ह नेतृत्व म्हणून ओळखले जात आहेत.
दुष्काळी काळात दिलासा देणारे सामाजिक कार्यही तसेच आहे या युवकाने 2013-14 च्या भयंकर दुष्काळात समाजकारणाचा खरा अर्थ दाखवून दिला. कुसडगाव येथे स्वतःच्या पुढाकाराने छावणी उभारून कुसडगाव, सरदवाडी, भोगलवाडी, डीसलेवाडी, सुरवसे वस्ती आणि सांगवी या भागातील जनावरांना चारा-पाण्याची सोय करण्यात आली होती आणी अशा संकटाच्या काळात अनेक शेतकऱ्यांना या छावणीमुळे मोठा दिलासा मिळाला होता.

शेतकऱ्यांसाठी उद्योगातून सेवा
“साई अर्थमूव्हर्स” या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोच वाढवली. शेतातील कामे, रस्ते आणि इतर विकासकामे करताना शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत त्यांना वेळोवेळी मदत केली

याच बरोबर शौक्षणिक क्षेत्रातही विद्यार्थ्यांसाठी आनेक उपक्रम राबविले आ.रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी कुसडगाव व परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप केले. शिक्षणावरील प्रेम आणि पुढच्या पिढीबद्दलची जबाबदारी या उपक्रमातून दिसून आली.

तसेच मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त गावात रक्तदान शिबिराचे आयोजन करून राष्ट्रवादी युवकांच्या माध्यमातून समाजात आरोग्याविषयी जागरूकता निर्माण केली.

“माझं गाव माझी शाळा” उपक्रमाचं नेतृत्व करत अदर्श निर्माण केला.
कोरोनाच्या काळात शाळा बंद असताना “माझं गाव माझी शाळा” हा आमदार रोहित दादा पवार यांचा उपक्रम तालुक्यात प्रथमच कुसडगाव येथे प्रसन्न कात्रजकर यांनी राबवला.मंदिरात,वडाखाली शाळा भरवून शिक्षण अखंड सुरू ठेवले समाजकारण आणि शिक्षणाचा सुंदर संगम कात्रजकर यांनी साधला.

आ.रोहित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कुसडगाव परिसरात दहा ते पंधरा शेत रस्त्यांची निर्मिती करण्यात आली. कार्यकर्त्यांच्या सहकार्याने पानंद रस्ते तयार करून शेतकऱ्यांचा माल थेट बाजारापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग देखील खुला झाला.

पक्षाने प्रसन्न कात्रजकर यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जामखेड तालुका उपाध्यक्ष तसेच जवळा जिल्हा परिषद गटप्रमुख म्हणून जबाबदारी दिली व ती निभावत त्यांनी पक्षसंघटना मजबूत केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी त्यांची कट्टर निष्ठा आणि बांधिलकी आजही तशीच कायम आहे.

ग्रामविकासासाठी सातत्यपूर्ण कामगिरी
कुसडगावात कोणतीही निवडणूक असो सोसायटी, ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद – कात्रजकर नेहमी अग्रभागी राहिले.
त्यांच्या नेतृत्वाखाली गावातील तलाव, बंधारे आणि पाणीपुरवठा प्रकल्प आमदार रोहित दादांच्या माध्यमातून मार्गी लागले, ज्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना झाला.
महिला सक्षमीकरणासाठी पत्नी रोहिणी प्रसन्न कात्रजकर व सुनंदा ताई पवार यांच्या सहकार्याने कुसडगाव व परिसरात 15 ते 20 महिला बचत गट स्थापन करून रोहित दादा पवार यांच्या माध्यमातून कर्जवाटप केले. महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळवून देण्याचे मोठे कार्य त्यांनी केले.

“महत्वाचा सामाजिक ठराव”
पोलीस दलासाठी जमिनीचा ठराव
कुसडगाव येथे महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल गटासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामसभा घेऊन ठराव पारित करण्याची ऐतिहासिक भूमिका कार्यकर्त्यांसह त्यांनी निभावली आणि या ठरावामुळे गावाच्या सामाजिक प्रतिष्ठेत भर पडली.
प्रसन्न कात्रजकर हे केवळ राजकारणी नसून समाजकार्याची जाण असलेले, शेतकऱ्यांच्या अडचणी समजणारे,तरुणांना प्रेरणा देणारे आणि सर्वसामान्यांच्या बाजूने कायम उभे राहणारे खरे जनसेवक आहेत.

त्यामुळे सध्या सोशल मिडियावर पंचायत समिती भावी सदस्य अशा अशयाचे बॅनर झळकत आसले तरी “भावी अनेक,पण निष्ठावंत एकच  प्रसन्न (अध्यक्ष) कात्रजकर!”
हा नारा आज त्यांच्या जनतेतील लोकप्रियतेचा पुरावा ठरत आहे.
तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकीवेळी कुसडगाव मधून सर्वाधिक लीड देण्याचा कार्यकर्त्यांसोबत प्रामाणिक प्रयत्न  त्यांनी केला आहे आणी याच पक्ष संघटनेच्या व विकास कामांच्या बळवर ते पंचायत समितीची निवडणूक लढवणार असल्याचे प्रसन्न कात्रजकर यांनी सांगितले आहे

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा