डॉ बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या चौकटीत देश चालतो:अमित चिंतामणी

- Advertisement -spot_img

जामखेड शहरात ठिकठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना करण्यात आले आभिवादन..

जामखेड प्रतिनिधी
७५ वर्षांपासून भारतीय लोकशाहीचा कणा ठरलेल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला मतदानाचा मूलभूत व पवित्र अधिकार दिला आहे.शासकीय व प्रशासकीय व्यवस्थेचे सर्व नियम घटनेत स्पष्टपणे नमूद असून देशाचा कारभार संविधानाच्या चौकटीतच चालतो. या ऐतिहासिक संविधानाची निर्मिती करून भारताला लोकशाहीचे भक्कम बळ देण्याचे कार्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. आपण त्यांच्या विचारांना प्रेरणेत होऊन मार्गक्रमण करत आहोत भविष्यातही डॉ.आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपला जाणार असल्याचे मत नगरसेवक अमित चिंतामणी यांनी व्यक्त केले.

जामखेड शहरातील सिद्धार्थ नगर येथे ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात म्हणाले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यकर्माला सलाम करणे म्हणजे खरे अभिवादन होय.त्यांची आठवण प्रत्येक पिढीने करत राहो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य मोठे आहे. त्यामुळे हजारो वर्ष त्यांची आठवण राहील.

यावेळी जेष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभात, नगरसेवक अमित चिंतामणी, प्राचार्य विकी घायतडक,बौद्धाचार्य अशोक आव्हाड,बाबा सोनवणे, सचिन सदाफुले,योगीराज घायतडक,कबीर घायतडक,प्रितम घायतडक, नितीन सदाफुले तसेच महिला उपस्थित होत्या.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा