वीज विषयक अडचणी लक्षात घेऊन त्या तांत्रिक दृष्ट्या कशा सोडवता येतील याची सखोल माहिती वेबसाईटवर उपलब्ध :सुजय उपाध्ये..

जामखेड प्रतिनिधी
प्रा. श्री. राम शिंदे यांच्या हस्ते जामखेड तालुक्यातील अधिकारी श्री. सुजय उपाध्ये यांनी तयार केलेल्या शेतकरी ऊर्जा वेबसाईटचे अनावरण केले आहे.

या वेबसाईटमध्ये शेतकऱ्यांना विजेसंदर्भात येणाऱ्या विविध अडचणी आणि त्यावरील उपाय यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. वीज विषयक अडचणी लक्षात घेऊन त्या तांत्रिक दृष्ट्या कशा सोडवता येतील आणि त्याद्वारे कमीत कमी खर्चात अधिक कार्यक्षमपणे वीजेचा वापर कसा करता येईल यासाठी विजेसंदर्भातील तांत्रिक माहिती सहज, सोप्या आणि नेमक्या पद्धतीने शेतकरी वर्गाला समजण्यासाठी शेतकरी ऊर्जा ही वेबसाईट तयार केली आहे.

त्याद्वारे शेतकऱ्यांना वीजेच्या समस्या सोडविण्यास मदत होणार आहे. याप्रसंगी श्री. विशालभाऊ शिंदे, श्री. संजयकाका काशीद, कर्जत कृषी उत्पन्न बाजारसमिती सभापती श्री. काकासाहेब तापके, श्री. विशाल भांडवलकर, श्री. संतोष कुर्डूले शेतकरी बांधव उपस्थित होते.

शेतकरी मित्र वेबसाईट वर काय आहे?
पारंपारिक मित्र गांडूळाप्रमाणेच ‘शेतकऱ्यांचा’ आधुनिक मित्र असलेल्या कॅपॅसिटरची ओळख!
कॅपॅसिटर न वापरल्यामुळे देशाचे आणि निसर्गाचे होणारे नुकसान याची माहिती.
कॅपॅसिटरचा वापर करणाऱ्या प्रगतीशील शेतकऱ्यांचे अनुभव.
“विद्युत डीपी वारंवार नादुरुस्त होण्याची कारणे आणि त्यावरील उपाय” याची सखोल माहिती.
विद्युत अपघाताची कारणे आणि त्यापासून बचावासाठी नागरिकांनी घ्यावयाची काळजी.
वेबसाईटचा पत्ता- https://shetkariurja.com/



