तरुणानों सामाजिक उपक्रम राबवुन गणेश उत्सव साजरा करावा पोलीस उप अधिक्षक प्रवीण लोखंडे यांनी केले अवहान..

जामखेड प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या निमित्ताने कर्जत विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांनी काल जामखेड शहर व तालुक्याचा आढाव घेतला मोठ्या आनंदाच्या वातावरणात श्री गणेशाचे आगमन झाले आणि हा उत्सव शांततेत पार पडवा वाहातुक सुरळीत राहावी याबाबतचा आढावा त्यांनी काही ठिकाणी पाहाणी करून जामखेड पोलीस स्टेशनला घेतला होता

यावेळी बोलताना पोलीस उप अधिक्षक प्रवीण लोखंडे म्हणाले की सण उत्सव आनंदाने व शांततेत साजरे करावेत शांतता कमिटीची बैठक घेऊन पोलीस प्रशासन नगरपरिषद महसूल महावितरण सार्वजनिक बांधकाम या विभागांसह गणेश मंडळे यांनी सर्व तयारी पुर्ण केलेली आहे

तसेच पोलीस प्रशासनाकडून कोणताही आनुचित प्रकार घडु नये या बाबत खबरदारी घेण्यात आली आहे याच आनुशंगाने सर्व गणेश मंडळांनी सी.सी. टी.व्ही.कॅमेरे बसवणे बंधनकारक आहे
गणेश विसर्जनाबाबतही नियोजन करण्यात आले आहे यासाठी पुरेसा बंदोबस्त आसुन ज्या ठिकाणी गरज आसेल तेथे जिवरक्षक तैनात करण्यात येणार आहे

तसेच शांततेत सुरू झालेल्या उत्सवात जर कुणी गैरप्रकार किंवा चुकीचे काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल तसेच याच दरम्यान ईद-ए-मिलाद हा सण सुध्दा येत आसल्याने दोन्ही उत्सव शांततेत साजरे होतील आशी आपेक्षा त्यांनी बोलताना व्यक्त केली.

युवकांना गणेशोत्सवा बाबत अवहान करताना लोखंडे म्हणाले की सामाजीक दृष्ट्या महत्त्वाच्या प्रश्नांना हात घालावा जसे की वृक्षारोपण रक्तदान शिबीर आरोग्य शिबीर या सारखे सामाजिक उपक्रम राबवुन व जनजागृती करून गणेश मंडळे गणेश उत्सव साजरा करू शकतात आसे अवहान त्यांनी मंडळांना केले आहे


