संत वामनभाऊ महाराज गड जमदारवाडी येथे पहिला रिंगण सोहळा..

जामखेड प्रतिनिधी
श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत श्री. विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. २५ रोजी श्रीक्षेत्र गहिनीनाथगड येथून संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे .

गहिनीनाथ गड, निवडुंगा, वाहली, सावरगाव, केकानवस्ती, वनवेवाडी,मातकुळी असा प्रवास करत शुक्रवारी जामखेड तालुक्यातील जांबवाडी जामखेड शहर जगदाळे वस्ती येथुन दुपारी चार वाजता संत वामनभाऊ महाराज गड जमदारवाडी येथे दिंडी दाखल होऊन नेत्र दिपक रिंगण सोहळा संपन्न होणार आहे.

या दिंडीचे तसेच जामखेड तालुक्यातील एकमेव गोल रिंगण या ठिकाणी संपन्न होत आसते त्यामुळे रिंगण सोहळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित आसतात.

या भागातून पंढरपूरला जाणारी संत वामनभाऊ महाराज यांची ही सर्वात मोठी दिंडी आहे. व या एकमेव दिंडीचे येथे रिंगण होते. त्यामुळे या परिसरातील भक्तगणांसाठी ही पर्वणीच ठरते. या दिंडीला अनन्य साधारण महत्व आहे.राज्यभरातून सुमारे 25 हजाराहून आधिक वारकरी या दिंडीत सहभागी होत आसतात . या रिंगण सोहळ्यानंतर पुढे जमादारवाडी येथे भोजन करून सारोळा येथे ही दिंडी मुक्कामी जाणार आहे

डोळ्याचे पारणे फेडणारा रिंगण सोहळा पाहण्यासाठी तालुक्यातील नागरिकांनी संत वामनभाऊ महाराज गड जमदारवाडी येथे शुक्रवारी दुपारी चार वाजता उपस्थित रहाण्याचे अवहान ह. भ. प. दादामहाराज सातपुते यांनी केले आहे.


