आन्न आणी औषध प्रशासन मंत्री ना. नरहरी झिरवाळ यांना भाजपा महिला आघाडीच्या तालुका उपाध्यक्षा लक्ष्मीताई पवार यांनी दिल्या शुभेच्छा…

- Advertisement -spot_img

भटके विमुक्त आदिवासी तसेच विधवा परित्यक्ता महिलांच्या प्रश्नाबाबत केली चर्चा..

जामखेड प्रतिनिधी

राज्याचे आन्न व औषध प्रशासन मंत्री ना. नरहरी झिरवाळ यांचा वाढदिवस नुकताच मोठ्या उत्साहात झाला त्यांना मिळालेल्या खात्याच्या मार्फत तळागाळातील जनतेपर्यंत तसेच भटके विमुक्त आदिवासी बांधवासह सर्व सामान्य नागरिकांच्या पर्यंत योजना व सुविधा पुरविण्यात मंत्री झिरवाळ यांनी प्रयत्न केले आहेत.

याच आनुशंगाने जामखेड शहरातील जनविकास सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा व भाजपा महिला आघाडीच्या उपाध्यक्षा लक्ष्मीताई पवार यांनी पारंपरिक पद्धतीने
औक्षण करून मंत्री महोदयांना शुभेच्छा दिल्या तसेच तळागाळातील समाजाच्या प्रश्ना संदर्भात लक्ष्मीताई पवार या वारंवार विविध विभागांच्या मंत्री महोदयांच्या भेटी घेऊन निवेदन देत मागण्यांचा पाठपुरावा करत आसतात

वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांनी मंत्री झिरवाळ यांच्याकडे आदिवासी भटके विमुक्त यांच्या आडचणी सांगितल्या तर समाज घटकातील दुर्लक्षित आसणाऱ्या विधवा, परितक्ता या भगिनींच्या मोठ्या आडचणी आहेत त्यांना सरकारच्या वतीने सक्षम करण्यासाठी आर्थिक साह्य मिळावे तसेच त्यांच्यासाठी ज्या योजना राबविण्यात येत आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी प्रशासनाकडु योग्य ती कार्यवाही करावी आशी मागणी केली आसल्याचे सांगितले.

तर मंत्री झिरवाळ हे आपल्या मागण्या संदर्भात योग्य तो निर्णय घेत आहेत तसेच या संदर्भात बैठक घेऊन चर्चाही करण्यात आली व लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे मंत्री झिरवाळ यांनी चर्चादरम्यान सांगितले आशी माहिती लक्ष्मीताई पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा