प्रभाग पाच मधील लाडक्या बहिणींसाठी लक्ष्मीताई पवार व राम पवार यांचा उपक्रम

- Advertisement -spot_img

जनविकास सेवाभावी संस्थेच्या वतीने मोफत ई- केवायसी केंद्र सुरू
प्रभागातील महिलांची सुटली आडचण.

जामखेड प्रतिनिधी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीच्या लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी मोफत करण्याची सुविधा जनविकास सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून प्रभाग पाचच्या इच्छुक उमेदवार लक्ष्मीताई पवार व भाजपा भटक्या मुक्त आघाडीचे प्रमुख राम पवार यांनी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

याबद्दल प्रभागातील माता भगिनींनी लक्ष्मीताई पवार व राम पवार यांचे आभार मानले.
सरकारने ई-केवायसी बंधनकारक केली आहे. ही प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत १८ नोव्हेंबर २०२५ आहे आणि जर हे न केल्यास लाडकी बहीण योजनेचे अनुदान थांबवले जाऊ शकते हीच अडचण लक्षात घेऊन आपल्या पाच नंबर प्रभागातील कोणतीही महिला वंचित राहू नये म्हणून मोफत ई-केवायसी केंद्र सुरू केले आहे. याचा लाभ दररोज शेकडो महिला घेत आहेत यावेळी जामखेड न्युजशी बोलताना लक्ष्मीताई पवार म्हणाल्या की, प्रभाग पाच मधील एकही महिला ई-केवायसी पासून वंचित राहू नये म्हणून आम्ही हे मोफत केंद्र सुरू केले आहे. ज्या महिलांचे ई-केवायसी करायचे राहिले आहे त्यांनी स्वतः चे व पतीचे आधार कार्ड तसेच लिंक असणारा मोबाईलबरोबर आणावा. आपण आठ दिवस हे मोफत केंद्र चालू ठेवणार आहोत.

प्रभाग पाच हा अनुसूचित जमातीसाठी राखीव असून जनविकास सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अध्यक्षा लक्ष्मीताई पवार व भाजपा भटक्या मुक्त आघाडीचे प्रमुख राम पवार यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवत आपल्या उमेदवारी साठी प्रबळ दावेदारी सिद्ध केली आहे. तसेच ते सभापती प्रा राम शिंदे यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत.

लक्ष्मीताई पवार व राम पवार यांच्या माध्यमातून अनेक वंचित गरजू लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनेचे लाभ मिळवून दिले तसेच अनेकांना जातीचे दाखले काढून दिले प्रभागातील जनतेसाठी दिवाळी फराळ याच बरोबर पदरमोड करत रस्त्यावर स्पीड ब्रेकर सह अनेक कामे मार्गी लावलेली आहेत.
प्रभाग पाच मध्ये सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या लक्ष्मीताई पवार किंवा राम पवार यांनी नगरसेवक पदासाठी उभे राहावे आम्ही सगळे बरोबर आहोत अशी प्रभागातील जनतेची मागणी आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा