समाजसेवक निलेश भाऊ गायवळ यांचा वाढदिवस वृद्धाश्रमात साजरा..

- Advertisement -spot_img

दत्तराज पवार यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व अल्पोहार जेवणाचा कार्यक्रमाचे नियोजन…

जामखेड प्रतिनिधी
समाजसेवक व जामखेड तालुक्याचे भूमिपुत्र व समाजसेवक निलेश भाऊ गायवळ यांचा वाढदिवस दिनांक 16 मार्च रोजी खर्ड्या जवळील नळी वडगाव येथील वृद्धाश्रमात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी उपस्थित सर्व वयस्कर लोकांची डॉक्टर बिपिनचंद्र लाड  यांनी आरोग्य तपासणी केली व त्यांना आजाराप्रमाणे औषध उपचार देण्यात आले, त्यानंतर सर्व उपस्थितांना अल्पोहार जेवण देण्यात आले.



सामाजिक क्षेत्रात काम करीत असताना निलेश भाऊंनी यापूर्वी अनेक गरजू व्यक्तींना मदतीचा हात दिला आहे. कोरोनाच्या काळात आरोग्याची काळजी घेण्यासाठी लागेल ती यंत्रणा त्यांनी पोहोच केली यामध्ये डॉक्टर आरोळे यांच्या हॉस्पिटलला कोरोना असलेल्या पेशंट साठी औषध उपचार तसेच हाताला काम नसलेल्या लोकांना किराणा व भाजीपाल्याचे वाटप त्याचबरोबर त्यांनी वाटेल ती व लागेल ती मदत जामखेड तालुक्यातील अनेक व्यक्तींना दिली होती. या सर्व घटनेचा जामखेड तालुका साक्षीदार आहे. त्याचबरोबर दुष्काळात पाणी वाटपाचे काम असो किंवा दवाखान्यात संकटात सापडलेल्या माणसाला व त्याच्या कुटुंबाला हातभार लावण्याचे काम त्यांनी केले होते, तसेच आजही त्यांचे समाजसेवेचे काम सुरू आहे.
कार्यक्रमाच्या नंतर निलेश भाऊंना वाढदिवसाच्या सर्वांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन पत्रकार दत्तराज पवार मित्र मंडळ खर्डा यांच्यावतीने घेण्यात आले होते.
यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शक सुनील दादा साळुंखे, बापू ढगे, बाला भैसडे, नीरज पवार, ग्रामीण विकास केंद्र खर्डा येथील संसाधन केंद्राच्या रेखाताई पवार, भूम येथील सामाजिक कार्यकर्त्या क्षीरसागर मॅडम,इत्यादी सह वृद्धाश्रमातील सर्व वयस्कर मंडळी व महिला उपस्थित होत्या.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा