आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश बाफना यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद – सभापती प्रा राम शिंदे

- Advertisement -spot_img

जामखेड शहरातील गणेश मंडळाचे आदर्श फाउंडेशनच्या वतीने स्वागत.

जामखेड प्रतिनिधी

सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे बाफना कुटुंबिय यात आपल्या आदर्श फाउंडेशनच्या माध्यमातून आकाश बाफना यांनी मोठी भर घातली आहे शहरातील प्रत्येक सामाजिक कार्यात हिरिरीने सहभाग नोंदवत आपला आदर्श निर्माण केला आहे. असे मत विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे यांनी व्यक्त केले.

जामखेड शहरातील गणेश मंडळाचे आदर्श फाउंडेशनच्या वतीने आकाश बाफना यांनी स्वागत केले. यावेळी सभापती प्रा. राम शिंदे यांनी
शहरातील शिवराजे तरूण मंडळ काटकरवस्ती, शंभू राजे बाजारतळ, शिवशांती पोकळेवस्ती, वीरराजे बीड रोड, मार्केट चा सिद्धीविनायक, जय हनुमान तरूण मंडळ जाधव गल्ली, शिवसुर्य प्रतिष्ठान पोलीस स्टेशन रोड, जाणता राजा गृप, पोलीस स्टेशन रोड, धर्मज्योत संभाजीनगर, योध्दा गृप मोरे वस्ती, रामचंद्र तरूण मंडळ कुंभार गल्ली, संघर्ष मित्रमंडळ कोर्ट रोड, जगदंब प्रतिष्ठान मेनरोड, महासंग्राम युवा मंच लक्ष्मी चौक, सावता गृप बोराटे वस्ती यासह अनेक मंडळांना भेटी देत आरती करत गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या.

आकाश बाफना यांच्या वतीने गणेश मंडळाचे सत्कार आयोजित करण्यात आले होते. या मंचावर शिंदे साहेबांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिंदे साहेब बोलत होते.

यावेळी बाफना कुटुंबीय तसेच भाजपाचे शिवकुमार डोंगरे सह अनेक मान्यवर उपस्थित होते आदर्श फाउंडेशन आयोजित गणेशोत्सव 2025
महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती माननीय नामदार रामजी शिंदे साहेब यांनी आदर्श फाउंडेशन चे अध्यक्ष आकाश भाऊ बाफना यांचे कौतुक केले. आकाश भाऊ बाफना यांचे समाज कार्य व गणेश उत्सव मध्ये सहभाग त्यामुळे जामखेड मधील युवा वर्गात असलेली पसंती ही कौतुकास्पद आहे असेही सांगितले.

यावेळी आकाश भाऊ बाफना यांनी सांगितले की जामखेड मध्ये पारंपरिक पद्धतीने सांस्कृतिक वारसा जपून सर्व गणेश मंडळांनी गणेशोत्सव साजरा केला समाजाप्रति असलेले बांधिलकी याबद्दल सर्वांचे सन्मान करणे हे आमचं कर्तव्य आहे सर्व जामखेड मधील सर्व गणेश उत्सव मधील अध्यक्ष, उपाध्यक्ष व सन्माननीय सदस्य यांचे आदर्श फाउंडेशन तर्फे स्वागत करण्यात आले.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा