पोलिसांचे ‘ऑपरेशन गोवंश’ यशस्वी; स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर-जामखेड पोलिसांची संयुक्त कारवाई..

- Advertisement -spot_img

जनावरांना जीवदान, आरोपी फरार
९ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त

जामखेड प्रतिनिधी

जामखेड शहरातील कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखा व जामखेड पोलीस स्टेशन यांची संयुक्त कारवाई, १९ गोवंशीय जनावरांची सुटका करुन ९,८०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यास मनाई असतांना देखील जामखेड शहरात सदाफुले वस्ती येथे काही जनावरे कत्तलीसाठी आणून त्यांना विना चारापाण्याचे डांबून ठेवले असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर‌ आणि जामखेड पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने छापा टाकत ११ जनावरांची सुटका केली.

कारवाई पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोलीस उपनिरीक्षक हरीश भोये, पोलीस अंमलदार श्यामसुंदर जाधव, अमोल कोकाटे, बाळासाहेब खेडकर, आकाश काळे,चंद्रकांत कुसळकर यांनी बातमीच्या ठिकाणी जाऊन कारवाई करणेबाबत सूचना देवून रवाना केले.सदर पथकाने जामखेड पोलीस स्टेशनचे
पोलीस उपनिरीक्षक किशोर गावडे, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर बेलेकर, पोलीस काॅन्स्टेबल जितेंद्र सरोदे, दिपक बोराडे, आकाश शेवाळे, गणेश काळाणे, योगेश दळवी, कुलदिप पोळवे यांना मदतीकरीता घेवून त्यांचेसह

दिनांक २५/१२/२०२५ रोजी सदाफुले वस्ती जामखेड या ठिकाणी जावून खात्री केली असता सदर ठिकाणी एका पत्र्याचे शेडमध्ये काही गोवंशीय जनावरे बिना चारा पाण्याची डांबून ठेवली असल्याचे दिसून आले तसेच सदर शेडजवळ एक इसम मिळून आला. पथकाने त्यास ताब्यात घेवून त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव १) मुसबीर अन्सार कुरेशी रा. सदाफुले वस्ती, जामखेड, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. त्यास डांबून ठेवलेल्या जनावरांबाबत विचारपुस करता त्याने सदरची जनावरे ही इसम नामे २) वसीम अन्सार कुरेशी रा. सदाफुले वस्ती, जामखेड (फरार) याचे मालकीची असून ती कत्तलीसाठी आणली असल्याचे सांगितले. सदर ठिकाणावरुन पथकाने ७,५०,०००/- रुपये किंमतीचे १५ गोवंशीय जिवंत जनावरे ताव्यात घेण्यात आली आहेत. सदर ठिकाणचे आजूबाजुची पाहणी करता काही,अंतरावर असलेल्या दोन खोल्याची पाहणी केली असता सदर ठिकाणी गोवंशीय जनावरांची कत्तल कत्तल केलेली हाडे, कातडी, शिंगे असा ३०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल व २,००,०००/- रुपये किमतीचे ०४ गोवंशीय जिवंत जनावरे मिळून आली आहेत. सदर गोवंशीय जनावरे कोणी आणली आहेत यावाबत विचारपुस करता सदरची जनावरे ही इसम नामे ३) फैजान सरवर कुरेशी रा. सदाफुले वस्ती, जामखेड(फरार) याने कत्तलीसाठी आणलेली असल्याची माहिती प्राप्त झाली,वरील दोन्ही ठिकाणावरुन १९ गोवंशीय जिवंत जनावरे, गोवंशीय जनावराचे हाडे, कातडी, शिंगे असा एकूण ९,८०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
   ताब्यातील इसम व मुद्देमाल जामखेड पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आला असून पोलीस काॅन्स्टेबल ७५० ज्ञानेश्वर विठ्ठल बेल्हेकर नेम जामखेड पोलीस स्टेशन यांचे फिर्यादीवरून जामखेड पोलीस ठाणे गु.र.नं. ६८१/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३२५, २७१, ३२५, ३(५) सह प्राणी संरक्षण अधिनियम कलम ५ (अ), ५(ख), ९, सह प्राण्यांचा छळ अधिनियम कलम ३ व ११ प्रमाणे गुन्हा राखल करण्यात आला असुन पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन करीत आहे. सदरची कारवाई मा.सोमनाथ घार्गे पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व जामखेड पोलीस स्टेशनचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा