जामखेड तालुक्यात पावसाची दडी! खुरपणीचा वेग मंदावला..

- Advertisement -spot_img

पिकांनी माना टाकल्या तर उशीराचा झालेला पेरा उगवेना.

जामखेड प्रतिनिधी
जामखेड तालुक्यात मान्सूनपूर्व चांगला पाऊस झाला होता त्यामुळे शेतीची मशागत करून शेतकऱ्यांनी महागाडे खते बियाणे घेऊन लगबगीने पेरणी उरकुन घेतली यामध्ये सोयाबीन,उडीद, मुग, मका, मोठ्या प्रमाणावर पेरा करण्यात आला आहे

मान्सूनचा पाऊस चांगला पडेल या अशेवर बळीराजाने मोठ्या प्रमाणावर शेतीत खर्च केला आहे परंतु गेली पंधरा विस दिवसांपासून सोसाट्याचा वारा सुटला आहे पाऊस पडण्याची काही चिन्ह दिसत नाहीत लवकर पेरणी झालेली पिक चांगली उगवली होती आणि आता खुरपणीचा हंगाम सुरू झाला होता पण पाऊस नसल्याने आहे तो ओलावा निघुन जाऊ नये म्हणून खुरपणी थांबल्या आहेत

तर उशीरा पेरणी झालेल्या शेतात ओलावा नसल्याने बियाने उगवलेच नाही त्यामुळे बळीराजा दुहेरी संकटात सापडलेला आहे आता कधी पाऊस पडतो या आशेवर खरीप पिकांचे व शेतकऱ्यांचे भवितव्य अवलंबून आहे

चौकट
हे संकट कमी म्हणून की काय उडीद पिकाला बुरशीसदृश्य रोग लागला आसल्याने मोठ्या प्रमाणावर उडीद जळु लागला आहे तर दरवर्षी उडीद जळतो म्हणुन सोयाबीन पेरली तर तीही या वर्षी जळुन खाक होऊ लागली आहे..

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा