जामखेडमध्ये पान मसाल्याचा मोठा साठा जप्त पोलिसांची मध्यरात्री कारवाई; लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

- Advertisement -spot_img

जामखेडमध्ये पान मसाल्याचा मोठा साठा जप्त

पोलिसांची मध्यरात्री कारवाई; लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

जामखेड प्रतिनिधी

जामखेड पोलिसांनी मध्यरात्री कारवाई करत मोठ्या प्रमाणात पान मसाल्याचा साठा जप्त केला असून या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जामखेड ते मोरेवस्ती रोडलगत प्रोफेसर कॉलनी परिसरात करण्यात आली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 299/2026 अन्वये भा.न्या. संहितेतील कलम 123, 223, 274, 275 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस शिपाई बाळु शांतीलाल खाडे यांनी फिर्याद दिली असून आरोपी म्हणून बाळु उर्फ शिवदत्त नंदकुमार मोहिते रा. बोराटे वस्ती, जामखेड याचे नाव नमूद करण्यात आले आहे.

दि. 15 मे रोजी रात्री सुमारे 10.25 वाजता ही कारवाई करण्यात आली. भेट देत पंचनामा केला.कारवाईदरम्यान डायरेक्टर स्पेशल, विमल, सुपर साऊंड व सम्राट या विविध कंपन्यांचा मोठ्या प्रमाणात पान मसाला जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालामध्ये शेकडो सिलबंद पाकिटांचा समावेश असून त्याची किंमत लाखोंमध्ये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास जामखेड पोलीस करीत आहेत.यावेळी खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत, पो. कॉ. बाळु खाडे, पो. कॉ. वैजिनाथ मिसाळ, पो. कॉ. धनराज बिराजदार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

चौकट

जामखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत, तेही पोलीस ठाण्याच्या अगदी जवळ मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा आढळून आल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.विशेष म्हणजे या प्रकरणात खर्डा पोलिसांनी येऊन कारवाई केल्यामुळे जामखेड पोलिसांना हा प्रकार माहिती नव्हता का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. शहरात खुलेआम गुटखा विक्री व साठेबाजी सुरू असताना स्थानिक पोलिसांकडून प्रभावी कारवाई का होत नाही याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा रंगू लागली
आहे.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा