कांदा दर घसरल्याने जामखेडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने चक्का जाम आंदोलन..
शेतकऱ्यांचा सरकारविरोधात संताप
“शेतमालाला हमीभाव द्या, अन्यथा आंदोलन तीव्र करू” आंदोलकांचा इशारा..
जामखेड प्रतिनिधी
कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी आज जामखेड शहरातील खर्डा चौक येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.

यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे नेते मंगेश (दादा) आजबे म्हणाले की,कष्टाने पिकवलेल्या कांद्याला योग्य भाव मिळालाच पाहिजे, हीच आमची ठाम भूमिका आहे. शेतकऱ्यांच्या घामाचा योग्य मोबदला मिळेपर्यंत आमचा संघर्ष थांबणार नाही. सरकारने तात्काळ कांद्याला हमीभाव जाहीर करून बाजार समितीत थेट खरेदी सुरू करावी, व्यापाऱ्यांची मनमानी थांबवावी आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा. शेतकरी वाचला तरच देश वाचेल.

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी करण्यात आलेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. आंदोलनामुळे खर्डा चौक परिसरात काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.

यावेळी कांद्याला हमीभाव देणे, सरकारी खरेदी सुरू करणे, निर्यात बंदी हटवणे, नुकसान भरपाई देणे तसेच कर्जमाफी लागू करणे या प्रमुख मागण्यांसाठी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच कांद्याला किमान २५ रुपये प्रति किलो दराने बाजार समितीतच खरेदी करण्यात यावी आणि यापूर्वी विक्री केलेल्या कांद्याला अनुदान देण्यात यावे, अशीही ठाम मागणी करण्यात आली.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.या आंदोलनात जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, तालुकाध्यक्ष विजयसिंह गोलेकर, राजेंद्र कोठारी, शेतकरी नेते सुनील लोंढे, नगरसेवक राजेंद्र गोरे, युवक तालुकाध्यक्ष प्रशांत राळेभात, प्रा. कैलास वराट, रमेश आजबे,युवा नेते प्रा. कुंडल राळेभात,वसिम सय्यद, माजीद कुरेशी,गणेश हगवणे,डॉ. कैलास हजारे,संतोष निगुडे,भिमराव पाटील,हरिभाऊ आजबे, सागर कोल्हे, चिराग आजबे, बापूसाहेब कार्ले, इस्माईल सय्यद, युवराज उगले, प्रसन्न कात्रजकर,नागेश कात्रजकर, सिध्देश्वर लटके,सचिन शिंदे, बजरंग डूचे, अनिल रेडे, सागर जगताप, बिलाल शेख, सागर भोसले, रामहरी गोपाळघरे, अनिल अडाले, दत्ता डिसले आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



