अध्यक्ष तात्यासाहेब बांदल यांच्या नेतृत्वाखाली जामखेड बंदला १०० टक्के उत्स्फूर्त प्रतिसाद.

- Advertisement -spot_img

ऑनलाईन औषध विक्रीविरोधात जामखेड तालुक्यात कडकडीत बंद…

अध्यक्ष तात्यासाहेब बांदल यांच्या नेतृत्वाखाली जामखेड बंदला १०० टक्के उत्स्फूर्त प्रतिसाद

जामखेड प्रतिनिधी –
ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात आज दि. २० मे रोजी जामखेड तालुक्यातील सर्व केमिस्ट बांधवांनी कडकडीत बंद पाळत आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जामखेड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष तात्यासाहेब बांदल यांच्या नेतृत्वाखाली हा बंद यशस्वी करण्यात आला.

तालुक्यातील बहुतांश मेडिकल दुकाने दिवसभर बंद ठेवण्यात आली होती.यावेळी बोलताना अध्यक्ष तात्यासाहेब बांदल म्हणाले की, ऑनलाईन औषध विक्रीमुळे पारंपरिक मेडिकल व्यवसाय धोक्यात आला असून स्थानिक व्यावसायिकांचा रोजगार संकटात सापडत आहे.

ऑनलाईन पद्धतीने विकल्या जाणाऱ्या औषधांच्या गुणवत्तेबाबतही अनेक प्रश्न निर्माण होत असून त्याचा थेट परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यावर होऊ शकतो. स्थानिक मेडिकल दुकानदार नागरिकांना योग्य मार्गदर्शन करतात, मात्र ऑनलाईन खरेदीमध्ये अशी सुविधा उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सर्व केमिस्ट बांधवांनी एकजुटीने बंद यशस्वी केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.जामखेड मेडिकल असोसिएशनचे उपाध्यक्ष अनिल शेठ बोधरा यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले.

ते म्हणाले की, ऑनलाईन फार्मसी व बनावट औषध विक्रीच्या विरोधात हा लढा असून राज्य व देशातील संघटनेच्या नेतृत्वाने दिलेल्या आवाहनाला जामखेड तालुक्यातील सर्व केमिस्ट बांधवांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे.

सरकारने आमच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा भविष्यात बेमुदत आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.यावेळी अध्यक्ष तात्यासाहेब बांदल, उपाध्यक्ष अनिल बोधरा, प्रविण कात्रजकर, सचिव किरण वाघमारे, खजिनदार महेश नारके, ग्रामीण उपाध्यक्ष वैभव मोहळकर, युवराज जगताप, संजय बांगर, संदीप राऊत, अरबाज सय्यद, अमर डुचे आदींसह तालुक्यातील अनेक मेडिकल व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा