पायलताई बाफना यांचा विद्यार्थ्यांच्या संस्कारक्षम शिक्षणावर भर; महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण

- Advertisement -spot_img

पायलताई बाफना यांचा विद्यार्थ्यांच्या संस्कारक्षम शिक्षणावर भर; महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण

जामखेड प्रतिनिधी

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच चांगले संस्कार अत्यावश्यक आहेत, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या पायलताई आकाश बाफना यांनी केले.

जामखेड शहरातील एकलव्य व तक्षशिला प्रायमरी शाळेत महाराष्ट्र दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी १ मे रोजी सकाळी ८.१५ वाजता पायलताई बाफना यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

कार्यक्रमास शिवसेना युवा नेते आकाश बाफना, पोलीस उपनिरीक्षक गणेश भागडे, पोलीस कॉन्स्टेबल देविदास पळसे, पत्रकार धनराज पवार, प्रल्हाद जावळे, शिवाजी डोंगरे, विजय टेकाळे, अमोल लोहार यांच्यासह मुख्याध्यापक अशोक जावळे, अशोक आजबे, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी पायलताई बाफना यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, शिक्षणासोबतच चांगले संस्कार मिळाल्यास विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक सक्षम होते. तसेच शहर व तालुक्यातील विद्यार्थिनी व महिलांच्या स्वावलंबनासाठी आणि सुरक्षिततेसाठी सातत्याने कार्य करत राहणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमादरम्यान पायलताई बाफना व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
शाळेमध्ये मंथन स्पर्धा परीक्षा नियमित घेतल्या जात असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर दिला जातो. यामुळेच या शाळेकडे पालक व विद्यार्थ्यांचा वाढता कल दिसून येत आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका रेखा फुले, पल्लवी बेंद्रे, स्वाती तवटे, कालिंदी पोकळे, ज्योती नागरगोजे, निता काळे, उषा ढोले, रेखा निगुडे, अश्विनी महारनवर तसेच मदतनीस द्रौपदी खराडे यांनी परिश्रम घेतले.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा