बकरी ईद व आगामी उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जामखेड पोलिसांचा शहरात रूट मार्च…

जामखेड प्रतिनिधी
आगामी बकरी ईद तसेच इतर सण-उत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पडावेत यासाठी जामखेड पोलिस प्रशासनाच्या वतीने आज दि. २३ मे २०२६ रोजी शहरात भव्य रूट मार्च काढण्यात आला.सकाळी १०.३० ते ११.१० या वेळेत जामखेड पोलीस स्टेशन, बीड कॉर्नर, जय हिंद चौक, मेन पेठ, खर्डा रोड, तपनेश्वर रोड, नूरानी कॉलनी तसेच सदाफुले वस्ती परिसरातून पोलिसांनी पायी मार्च करत नागरिकांना कायदा व सुव्यवस्थेबाबत सतर्कतेचा संदेश दिला.

त्यानंतर जामखेड बस स्थानक परिसरात जमाव विसर्जनाचा सराव घेण्यात आला.या सरावावेळी पोलिसांनी विविध सुरक्षा साहित्याचा वापर करून आपत्कालीन परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था कशी राखली जाते याचे प्रात्यक्षिक दाखवले.

या रूट मार्चमध्ये पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, API वर्षा जाधव मॅडम, PSI किशोर गावडे तसेच जामखेड, कर्जत, खर्डा व मिरजगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी, पोलीस अंमलदार आणि होमगार्ड सहभागी झाले होते.

जामखेड पोलिसांच्या या उपक्रमामुळे शहरात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनीही पोलिस प्रशासनाच्या कार्याचे स्वागत केले.



