राजमाता जिजाऊंचे नाव शॉपिंग कॉम्प्लेक्सला द्या; मनसेची नगर परिषदेकडे जोरदार मागणी.

- Advertisement -spot_img

राजमाता जिजाऊंचे नाव शॉपिंग कॉम्प्लेक्सला द्या; मनसेची नगर परिषदेकडे जोरदार मागणी

जामखेडच्या सांस्कृतिक ओळखीला मिळेल नवे बळ; मनसेकडून मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

जामखेड प्रतिनिधी

जामखेड नगर परिषदेमार्फत शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सला “राजमाता जिजाऊ शॉपिंग कॉम्प्लेक्स” असे नाव देण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

यासंदर्भात नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन मनसे पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष श्री. प्रदीप टापरे, शहर उपाध्यक्ष श्री. अनिल पाटील, श्री. आकाश साठे, श्री. भाऊसाहेब पोटफोडे आदी उपस्थित होते.

मनसेच्या वतीने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना शौर्य, स्वाभिमान, न्यायनिष्ठा आणि राष्ट्रभक्तीचे संस्कार दिले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि प्रेरणादायी कार्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासाला नवे दिशा मिळाली. त्यामुळे त्यांच्या नावाने शॉपिंग कॉम्प्लेक्सचे नामकरण झाल्यास जामखेड शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभवात भर पडेल.

तसेच नवीन पिढीसमोर आदर्श विचार आणि संस्कारांचे प्रतीक म्हणून राजमाता जिजाऊंचे कार्य अधिक प्रभावीपणे पोहोचेल, असा विश्वासही मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

नगर परिषद प्रशासनाने या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा