नरसापूर येथील अमानुष घटनेचा जामखेड येथे तीव्र निषेध.

- Advertisement -spot_img

नरसापूर येथील अमानुष घटनेचा तीव्र निषेध.

आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी : पांडुराजे भोसले

जामखेड, प्रतिनिधी

नरसापूर येथे घडलेल्या एका अत्यंत संतापजनक आणि हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. तीन वर्षांच्या चिमुकलीला “खाऊ देतो” असे आमिष दाखवून गोठ्यात नेण्यात आले व तिच्यावर अमानुष अत्याचार करून निर्दयीपणे हत्या करण्यात आली.

त्यानंतर मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले असून संतापाची लाट उसळली आहे.

या घटनेचा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. संस्थेचे पांडुराजे भोसले यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करताना म्हटले की, “ही घटना महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारी आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यात स्त्रियांच्या सन्मानासाठी कठोर कायदे केले होते. परस्त्रीचा अवमान करणाऱ्याला तात्काळ व कठोर शिक्षा केली जात असे.”
पुढे बोलताना त्यांनी शासनाकडे मागणी केली की, “या प्रकरणी जलदगती न्यायालयात खटला चालवून आरोपीस लवकरात लवकर कठोरात कठोर शिक्षा द्यावी. न्यायप्रक्रिया विलंबित होत असल्यामुळे अशा प्रवृत्तींना बळ मिळते. त्यामुळे दोषीला फाशीची शिक्षा देऊन इतरांना कठोर संदेश द्यावा.”

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तसेच जामखेड येथील ग्रामस्थ आणि धारकरी यांच्या वतीने ही मागणी करण्यात आली आहे.
यावेळी जगन्नाथ म्हेत्रे, बंटी पाटील, उमेश राळेभात, सचिन देशमुख, नागेश आरेकर, ओम भोसले, विवेक देशपांडे, विनायक राळेभात, आदित्य पोकळे, निखील चव्हाण, प्रमोद दाणी, विजय कुलकर्णी, निलेश मोरे, महेश बहिर, दर्शन भोसले, भाऊ पोटफोडे, सागर घुमरे, प्रविण होळकर, भरत बांगर आदी धारकरी उपस्थित होते.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा