छत्रपती शिवाजी महाराज नगर व संताजीनगर परिसराला निवडणूकीत दिलेला शब्द आम्ही पाळला:नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी..

- Advertisement -spot_img

छत्रपती शिवाजी महाराज नगर व संताजीनगर परिसराला निवडणूकीत दिलेला शब्द आम्ही पाळला:नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी.

छत्रपती शिवाजी महाराज नगर व संताजीनगर भागातील ड्रेनेज लाईनचे काम दर्जेदार करणार :नगरसेवक प्रविण सानप

जामखेड प्रतिनिधी
मागील वर्षीच्या पावसाळ्यात छत्रपती शिवाजी महाराज नगर व संताजीनगर परिसरातील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला होता. या समस्येच्या कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी परिसरातील रहिवाशांनी सभापती प्रा. राम शिंदे यांच्याकडे मागणी केली होती.

त्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी व प्रभागाचे नगरसेवक प्रविण सानप यांनी पाठपुरावा करून भूमिगत ड्रेनेज लाईनच्या कामाला गती दिली असून कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.

पाहणीदरम्यान नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांनी सांगितले की, निवडणूक प्रचारादरम्यान नागरिकांनी या भागातील पाणी साचण्याची व घरांमध्ये पाणी शिरण्याची गंभीर समस्या मांडली होती. त्यावेळी ही समस्या प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार आता भूमिगत ड्रेनेज लाईनचे काम सुरू करण्यात आले असून ते दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच शहरातील इतर भागांतील पावसाळ्यापूर्वीच्या समस्यांचाही आढावा घेऊन संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

नगरसेवक प्रविण सानप यांनी सांगितले की, हे काम वैशिष्ट्यपुर्ण निधि अंतर्गत करण्यात येत आहे. नागरिकांना घरातील सांडपाणी ड्रेनेज लाईनमध्ये सोडता यावे यासाठी विविध ठिकाणी चेंबरची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच ड्रेनेज लाईनची खोली सुमारे सहा फूट ठेवण्यात आल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होऊन परिसरातील पाणी साचण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल.

यावेळी परिसरातील रहिवासी राम निकम यांनीही समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, “गेल्या वर्षी घरात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले होते. ही बाब सभापती प्रा. राम शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी व नगरसेवक प्रविण सानप यांच्या माध्यमातून तातडीने कार्यवाही केली. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून आम्ही त्यांचे आभारी आहोत.”
या पाहणीवेळी नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, नगरसेवक प्रविण सानप, शिक्षक नेते राम निकम यांच्यासह प्रभागातील महिला भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट
संताजीनगर व छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे भूमिगत ड्रेनेज लाईनचे काम सुरू.
मागील वर्षी पावसामुळे घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे नुकसान झाले होते.
सभापती प्रा. राम शिंदे यांच्या सूचनेनंतर कामाला गती.
ड्रेनेज लाईनची खोली सुमारे सहा फूट ठेवण्यात येणार.
सांडपाण्याच्या व्यवस्थेसाठी स्वतंत्र चेंबर उभारण्यात येणार.
पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा