वर्दी उतरवली,पण कर्तव्य सुरूच ठेवणार आहे ” : संजय लोहकरे

- Advertisement -spot_img

वाकीचे सुपुत्र, पोलिस उपअधीक्षक संजय लोहकरे यांचा सेवापूर्ती सोहळा थाटात संपन्न..

“वर्दी उतरवली,पण कर्तव्य सुरूच ठेवणार आहे ” : संजय लोहकरे

जामखेड प्रतिनिधी
खाकी वर्दी म्हणजे सामान्यांना न्याय मिळवून देणारी ताकद”हे ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून सिद्ध करणारे वाकी गावचे सुपुत्र व जामखेड तालुक्याचे भूषण मा. श्री संजय महादेव लोहकरे, पोलिस उपअधीक्षक, लोहमार्ग जालना, छ. संभाजीनगर यांचा सेवापूर्ती सोहळा रविवारी (दि. १४ जून २०२६) रोजी मूळगावी वाकी येथे मोठ्या उत्साहात व भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

१९९३ बॅचचे कर्तव्यदक्ष अधिकारी
संजय लोहकरे साहेब १९९३ च्या पोलिस उपनिरीक्षक बॅचचे अधिकारी म्हणून पोलिस दलात रुजू झाले. सुरुवातीला नागपूर, त्यानंतर छ. संभाजीनगर, बीड, जालना, अमरावती जिल्ह्यात त्यांनी सेवा बजावली. अखेर लोहमार्ग जालना येथून पोलिस उपअधीक्षक पदावरून दि. ३१ मे २०२६ रोजी ते सेवानिवृत्त झाले.

गाजलेली पोलिस ठाणी : न्यायाची चूल पेटवली

संजय लोहकरे साहेबांच्या कर्तव्यदक्ष कामाची दखल घेणारी काही पोलिस ठाणी विशेष उल्लेखनीय ठरली :
लासूर पो. स्टे. (ता. गंगापूर, जि. छ. संभाजीनगर), परळी पो. स्टे., शिवाजीनगर पो. स्टे., नेकनूर पो. स्टे., गेवराई पो. स्टे., भ्रष्टाचार विरोधी पथक बीड, अंजनगाव सुर्जी पो. स्टे. (अमरावती), जालना शहर पो. स्टेट. या विविध ठिकाणी त्यांनी कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. “पोलिस म्हणजे जनतेचा सेवक” हे ब्रीदवाक्य त्यांनी कृतीतून दाखवून दिले.

वाकी गावाने केला अभिमानाने सन्मान
लोहकरे साहेबांच्या यशस्वी आणि प्रेरणादायी कामगिरीने प्रेरित होऊन वाकी ग्रामस्थ, ग्रामपंचायत वाकी व पोलिस मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व ग्रंथतुला करून भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या वेळी परिसरातील आजी-माजी पोलिस अधिकारी, सरपंच गणेश वायकर , उपसरपंच, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, नातेवाईक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“वाकीच्या मातीत जन्म घेऊन खाकीचा सन्मान वाढवणारे लोहकरे साहेब हे आमच्या गावाचे व तालुक्याचे खरे भूषण आहेत. त्यांच्या शिस्त, प्रामाणिकपणा व सर्वसामान्यांप्रती असलेल्या आपुलकीमुळे ते आजही जनतेच्या मनात घर करून आहेत”अशा भावना माजी सरपंच यांनी व्यक्त केल्या.

सत्काराला उत्तर देताना लोहकरे साहेब भावुक झाले. ते म्हणाले, “३३ वर्षे पोलिस दलात सेवा करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य. या काळात अनेक चांगली माणसे भेटली, अनेक आव्हाने पेलली. वर्दी घातली तेव्हा शपथ घेतली होती अन्याय करणार नाही आणि अन्याय सहन करणार नाही. ती शपथ शेवटपर्यंत पाळली. सेवानिवृत्त झालो तरी समाजसेवा सुरूच राहील. वाकी गावासाठी, जामखेड तालुक्यासाठी जे काही करता येईल ते नक्की करणार. तरुणांनी पोलिस दलात यावे, हीच माझी इच्छा आहे.”

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री जे के पगार, निवृत्त पोलिस उपअधीक्षक, नाशिक, दशरथ चौधरी पोलीस निरीक्षक जामखेड पो स्टे, असिफ पठाण, पो. नि. नांदेड हे उपस्थित होते.

साहेबांचे थोरले बंधु श्री हरिश्चंद्र लोहकरे, निवृत्त वरिष्ठ प्रबंधक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांनी साहेबांच्या शिक्षणाचे दाखले दिले तसेच त्यांनी त्यांचे मेहुणे श्री तुकाराम काटे, निवृत्त पोलिस उपअधीक्षक, मुंबई व कै. सुदाम कुसेकर, अभियंता सा बा विभाग, रत्नागिरी यांनी केलेल्या सहकार्य आणि मार्गदर्शनाचे आभार मानले.

संजय लोहकरे साहेबांचे चिरंजीव कु अजिंक्य लोहकरे यांनी आपल्या वडिलांनी कुटुंबापेक्षा कर्तव्याला अधिक प्राधान्य दिले तसेच कुटुंब प्रमुख म्हणून कसलीही उणीव भासू दिली नाही असे सांगून वडिलांनी आता त्यांचे इतर कौशल्य जोपासण्यास वेळ द्यावा हे सांगितले.

प्रा मधुकर आबा राळेभात यांनी लोहकरे साहेबांच्या कॉलेज जीवनातील आठवणी सांगताना साहेबांची मितभाषी आणि प्रामाणिक वृत्ती चे दाखले दिले. आपल्या विद्यार्थ्यांच्या सेवापूर्ती सोहळ्यास उपस्थित राहण्याबद्दल त्यांचे मन आनंदाने भरून आले असे सांगितले.
संजयजी लोहकरे साहेबांनी उपस्थित मान्यवर, प्रमुख पाहुणे, मित्र, नातेवाईक, आप्तेष्ठ, ग्रामस्थ यांचे आभार मानले आणि विद्यार्थी, परीक्षार्थी यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस मार्गदर्शन करून प्रेरणा दिली. या सेवापूर्ती सोहळ्याची जबाबदारी श्री तात्याराम सावंत, स पो उ निरीक्षक, वसई विरार, श्री विक्रम उदमले, पो उ निरीक्षक, ठाणे, श्री मारुती पवडमल पो उ निरीक्षक, मुंबई, श्री दिलीप धावडे निवृत्त पोलीस कर्मचारी यांनी पार पाडली.

त्यांना सेवा निवृत्त अधिकारी व कर्मचारी श्री प्रकाश काका कुलकर्णी, श्री हरिश्चंद्र लोहकरे, श्री तुळशीराम उदमले यांनी मार्गदर्शन केले.तसेच श्री सुनील शेळके सर, श्री हनुमंत निंबाळकर सर, श्री ईश्वर उदमले कृषी अधिकारी, श्री बाळासाहेब कोळेकर, श्री अमृत उदमले, पोलिस, मुंबई यांनी मोलाची कामगिरी बजावली.
कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा श्री भूषण फडतरे यांनी मांडली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुनील शेळके सर यांनी केले व आभार प्रदर्शन श्री सचिन लोहकरे, प्रबंधक, महाराष्ट्र बँक यांनी केले.

चौकट
जामखेड तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने पोलीस उपअधिक्षक संजय लोहकरे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला यावेळी जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष नासीर पठाण, उपाध्यक्ष अशोक निमोणकर, जामखेड मिडिया क्लबचे अध्यक्ष सुदाम वराट यांच्या सह अनेक जण उपस्थित होते.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा