पश्चिम बंगालसह विविध राज्यांतील यशानंतर जामखेडमध्ये भाजपाचा जल्लोष; पेढे वाटून विजयोत्सव साजरा.

- Advertisement -spot_img

“पश्चिम बंगालमधील विजय हा भाजपासाठी ऐतिहासिक टप्पा” : संजय काशिद

पश्चिम बंगालसह विविध राज्यांतील यशानंतर जामखेडमध्ये भाजपाचा जल्लोष; पेढे वाटून विजयोत्सव साजरा.

जामखेड प्रतिनिधी
पश्चिम बंगाल, आसाम आणि पुद्दुचेरी येथील विधानसभा निवडणुकांमध्ये तसेच राज्यातील पोटनिवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर जामखेड शहर भाजपाच्या वतीने उत्साहात विजयोत्सव साजरा करण्यात आला. शहरात फटाक्यांची आतषबाजी, जोरदार घोषणाबाजी आणि एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.

या विजयोत्सवाचे आयोजन सभापती प्रा. राम शिंदे यांच्या संपर्क कार्यालयासमोर करण्यात आले होते. यावेळी भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विजयाचा आनंद व्यक्त केला. ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला, तर भगवे झेंडे फडकवत कार्यकर्त्यांनी जल्लोषात सहभाग नोंदवला.

यावेळी बोलताना मंडलाध्यक्ष संजय काशिद यांनी सांगितले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी , गृहमंत्री अमित शहा राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबिन आणि पक्ष नेतृत्वाच्या प्रभावी मार्गदर्शनाखाली भाजपाने विविध राज्यांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विशेषतः पश्चिम बंगालमध्ये मिळालेला विजय ऐतिहासिक असून, तेथे ममता बॅनर्जी यांच्या वर्चस्वाला मोठे आव्हान उभे केले आहे.

या यशामागे तळागाळातील कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद करत सर्वांचे अभिनंदन विजयी उत्सवादरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.

या विजयोत्सवात तालुका अध्यक्ष बापूराव ढवळे, माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर, बाजार समितीचे सभापती पै. शरद कार्ले, अनंता खेत्रे, दत्तात्रय वारे, ॲड. अजय काशिद, रवि सुरवसे, विष्णू भोंडवे, मोहन पवार, गटनेते तथा नगरसेवक तात्यासाहेब पोकळे, पवन राळेभात, मोहन (मामा) गडदे, अनिल यादव, गोरख घनवट, अर्जुन म्हेत्रे, मनोज कुलकर्णी, माऊली अंदुरे, संजय राऊत, बाळासाहेब गायकवाड, राहुल चोरगे, नागराज मुरुमकर, गणेश नेहरकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा