
पावसाळी आधिवेशनात आनेक लोकोपयोगी निर्णय..

जामखेड प्रतिनिधी
जामखेड चे भूमिपुत्र महाराष्ट्र विधान परिषद सभापती नामदार प्रा. राम शिंदे यांनी पावसाळी अधिवेशन दरम्यान संपूर्ण महाराष्ट्राला यशस्वीरित्या न्याय दिला व अनेक लोकोपयोगी लोक कल्याणकारी कामे मार्गी लावली त्याबद्दल सभापती प्रा. राम शिंदे यांचा आदर्श फाउंडेशन तर्फे सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थित आदर्श फाउंडेशनचे अध्यक्ष आकाश जी बाफना, भाजपा शहर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष पिंटू शेठ बोरा, भाजपा शहर उपाध्यक्ष अशोक शेठ बाफना, जैन श्रावक संघाचे उपाध्यक्ष महावीर जी बाफना, उद्योजक निलेश शेठ पारख ,अमित शेठ पारख, तुषार शेठ कोकरेचा, दत्तात्रय जगताप व सर्व सहकारी मित्र उपस्थित होते.




