
जामखेड प्रतिनिधी
महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचे कट्टर समर्थक आणि अहिल्यानगर जिल्हा मंजूर फेडरेशनचे माजी संचालक मनोज (काका) कुलकर्णी यांची भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश राज्य परिषद सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सिध्दीविनायक प्रतिष्ठान व परशुराम प्रतिष्ठानतर्फे त्यांचा विशेष गौरव करण्यात आला.

या प्रसंगी मनोज काका कुलकर्णी म्हणाले की, “इतकी वर्षे पक्षाची निष्ठेने सेवा केल्यामुळे पक्षाने मला राज्य कार्यकारिणीत स्थान दिले. ही माझ्यासाठी मोठी संधी आहे. या पदामुळे माझ्यावर मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे. मी हा सन्मान समाजातील प्रत्येक घटकाच्या हितासाठी वापरेन आणि कुणीही अडचणीत असेल तर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन,” असे भावनिक आश्वासन त्यांनी यावेळी दिले. तसेच सर्वांचा आभार मानत त्यांनी थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेतले.

या गौरव सोहळ्याला सुंदर काका देशमुख, कल्याणराव घायाळ देवा, बंडू काका जोशी, कांता कुलकर्णी, रवींद्र किंबवणे, रोहित देशमुख, सचिन देशमुख, विजय कुलकर्णी, गणेश जोशी, प्रमोद गाणी, सुहास देशमुख, राघवेंद्र कुलकर्णी आदी समाजबांधव उपस्थित होते.



