जामखेड तालुका भाजपाच्या वतीने बलिदान दिनानिमित्त श्यामा प्रसाद मुखर्जी यांना विनम्र अभिवादन

- Advertisement -spot_img

जामखेड तालुका भाजपाच्या वतीने भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

जामखेड प्रतिनिधी

दरवर्षी २३ जून हा बलिदान दिन पाळला जातो. याच दिवशी, १९५३ मध्ये, श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे रहस्यमय परिस्थितीत निधन झाले होते. ते भारतीय राजकारणी, वकील आणि भारतीय जनसंघाचे संस्थापक होते. आज जामखेड तालुका भाजपाच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.

भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टी जामखेड तालुक्याच्या वतीने ग्रामीण मंडलाध्यक्ष बापुराव ढवळे व शहर मंडलाध्यक्ष संजय काशिद यांच्या मार्गदर्शनाखाली अभिवादन करण्यात आले.

यावेळी भाजपा ग्रामीण मंडलाध्यक्ष बापुराव ढवळे व शहर मंडलाध्यक्ष संजय काशिद, माजी तालुकाध्यक्ष अजय काशीद, भाजपा ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे  प्रास्ताविक मनोज कुलकर्णी यांनी केले
यावेळी जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती
डॉ भगवानराव मुरूमकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ पाचारणे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बाजीराव गोपाळघरे, ओबीसी तालुका अध्यक्ष विष्णू गंभीरे, माजी शहराध्याक्ष पवनराजे राळेभात,  प्रवीण चोरडिया, पोपट राळेभात, माजी नगराध्यक्ष  सोमनाथ राळेभात, नगरसेवक मोहन पवार, मनोज  मोहन मामा गडदे, सुरज काळे, राहुल चोरगे, अण्णा ढवळे, तात्याराम पोकळे, डॉ  ज्ञानेश्वर झेंडे, मोहन देवकाते, गोरख घनवट, डॉ अल्ताफ शेख , प्रविन होळकर, दत्ता माने, डॉ विठ्ठल राळेभात, रविंद्र बांगर यांच्या सह अनेक मान्यवर भाजपा नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisement -spot_img
Ashok Veer
Ashok Veer
अहिल्यानगर जिल्हातील जेष्ठ पत्रकार
आणखी महत्वाच्या बातम्या
- Advertisement -spot_img
आणखी वाचा